शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vodafone-Idea चा जबरदस्त धमाका; 1.5GB च्या पॅकमध्ये आता रोज मिळणार 3GB डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 1:40 PM

1 / 10
Vodafone-Idea नं आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. कंपनीनं रोज 1.5GB डेटा मिळणाऱ्या पॅकमध्ये आता दुप्पट डेटा देण्यास सुरूवात केली आहे.
2 / 10
आतापर्यंत कंपनी 2GB डेटा देत असलेल्या पॅकमध्ये दररोज दुप्पट डेटा देत होती. सध्या याव्यतिरिक्त कंपनी रोलओव्हर आणि फ्री नाईट डेटासारख्या सुविधाही देत आहे. एवढंच नाही तर सध्या कंपनीनं डबल डेटा ऑफरही सुरू केली आहे.
3 / 10
टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार आता कंपनी 249, 399 आणि 599 रूपयांच्या प्लॅनमध्ये आता दुप्पट डेटा देणार आहे.
4 / 10
या सर्व प्लॅन्समध्ये 1.5 GB डेटा दररोज देण्यात येतो. यामध्ये आता ऑफर अंतर्गत 3 GB डेटा देण्यात येत आहे. हे प्लॅन 28 दिवस, 56 दिवस आणि 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतात.
5 / 10
परंतु सध्या या ऑफरचा लाभ सर्वांना मिळणार नसून काही ठराविकच ग्राहकांना देण्यात येणार आहे. या सर्व प्लॅन्समध्ये रोज मिळणाऱ्या डेटा व्यतिरिक्त सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएमएसदेखील देण्यात येतात.
6 / 10
याव्यतिरिक्त कंपनी ग्राहकांना Vi Movies & TV Classic चा मोफत अॅक्सेस, विकेंड डेटा रोलओव्हर आणि Binge All Night या सुविधाही देत आहे.
7 / 10
विकेंड टेडा रोल ओव्हर अंतर्गत कंपनी सोमवार ते शुक्रवारपर्यंत वाचलेला डेटा विकेंडमध्ये वापरासाठी देते.
8 / 10
तर दुसरीकडे Binge All Night अंतर्गत ग्राहकांना रोज रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अनलिमिटेड डेटाचा वापर करता येतो.
9 / 10
Vodafone-Idea रोज 2 GB डेटा मिळणाऱ्या तीन प्रीपेड प्लॅन्समध्ये यापूर्वीपासूनच ही सुविधा देत आहे. हे तीन प्लॅन्स 299 रूपये, 449 रूपये आणि 599 रूपयांचे आहेत.
10 / 10
या प्लॅनसोबत 28 दिवस, 56 दिवस आणि 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये ऑफर अंतर्गत 4GB डेटाही देण्यात येतो. तसंत सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधाही मिळते.
टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाInternetइंटरनेट