शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१०२ रूपये कमी देऊनही मिळतेय अधिक व्हॅलिडिटी आणि डेटा; पाहा Vodafone-Idea चा जबरदस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 4:22 PM

1 / 15
सर्वच टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही नवे रिचार्ज प्लॅन्स किंवा अन्य योजना घेऊन येत असतात. परंतु अशा परिस्थिती ग्राहकांना प्लॅन निवडणं कठीण होतं.
2 / 15
दरम्यान, आपण अनेक कंपन्यांच्या प्लॅन्सची यापूर्वीही तुलना केली आहे. आज व्होडाफोन आयडिया या कंपनीच्या काही प्रीपेड प्लॅन्सबद्दल जाणून घेऊया.
3 / 15
यामध्ये ग्राहकांना १०२ रूपये कमी देऊनही ८४ दिवसांची व्हॅलिडिटी आणि अधिक डेटा मिळतो.
4 / 15
जर तुम्ही व्होडाफोन आयडियाचे ग्राहक असाल आणि तुम्ही ८४ दिवसांचे प्लॅन पाहत असाल तर तुमची नजर नक्कीच ८०१ रूपये आणि ६९९ रूपयांच्या प्लॅनवर गेली असेल.
5 / 15
हे दोन्ही प्लॅन्स ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीवाले आहेत. तसंच यासोबत अनलिमिटेड कॉलिंगचा लाभही मिळतो. परंतु या प्लॅन्ससोबत मिळणारा डेटा आणि अन्य काही बाबींमध्ये फरक आहे.
6 / 15
व्होडाफोन आयडियाच्या ६९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये सर्वच नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.
7 / 15
तसंच यासोबत ८४ दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज ४ जीबी डेटा मिळतो. याप्रकारे यामध्ये एकूण ३३६ जीबी डेटा मिळतो.
8 / 15
यामध्ये फ्री नाईट डेटा, विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies & TV Classic चं अॅक्सेसही मिळतं.
9 / 15
जर तुम्हाला Disney + Hotstar ची मेंबरशिप कामी येणार नसेल तर तुम्ही ६९९ रूपयांचा प्लॅनही घेऊ शकतात.
10 / 15
तसंच यामध्ये दररोज ३ जीबी डेटा देण्यात येतो. यामध्ये ४८ जीबी अतिरिक्त डेटाही देण्यात येतो. अशाप्रकारे यात एकूण ३०० जीबी डेटा मिळतो.
11 / 15
याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही देण्यात येते. याशिवाय या प्लॅन्समध्ये नाईट डेटा, विकेंड डेटा रोलओव्हरही मिळतं.
12 / 15
यासह कंपनी ग्राहकांना Vi Movies & TV Classic च्या अॅक्सेससह Disney + Hotstar चं एका वर्षाचं सबस्क्रिप्शनही देते.
13 / 15
दोन्ही प्लॅन्सचा विचार केला तर यात व्हॅलिडिटी तितकीच आहे आणि अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएसही तितकेच देण्यात येतात.
14 / 15
परंतु ८०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar चं सबस्क्रिप्शन देण्यात येतं. तर ६९९ च्या प्लॅनमध्ये तुम्हाला कमी पैसे देऊनही अधिक डेटा देण्यात येतो.
15 / 15
जर तुम्हाला Disney + Hotstar ची मेंबरशिप कामी येणार नसेल तर तुम्ही ६९९ रूपयांचा प्लॅनही घेऊ शकतात.
टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाSmartphoneस्मार्टफोनInternetइंटरनेट