शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१९६ रूपये कमी देऊनही मिळतेय ३६५ दिवसांची वैधता; 'ही' कंपनी देतेय डेटा कॉलिंगसह Zee5 मेंबरशिप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 2:31 PM

1 / 12
सध्या दूरसंचार क्षेत्रात सुरू असलेल्या स्पर्धेचा फायदा ग्राहकांना होताना दिसत आहे. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन आयडिया ही अनेक आकर्षक प्लॅन्स ऑफर करत आहे.
2 / 12
अनेकदा ग्राहकांना या प्लॅन्समधून कोणता प्लॅन निवडावा हा विचार येतो. आज आपण जाणून घेऊ व्होडाफोन आयजिया या कंपनीचे ३६५ दिवस (Vi 365 days plan) चालणारे दोन प्लॅन्स.
3 / 12
१९६ रूपये कमी देऊनही ३६५ दिवसांची वैधता, डेटा कॉलिंगसोबतच Zee5 सबस्क्रिप्शनही देण्यात येतो. जाणून घेऊया या दोन्ही प्लॅन्सच्या बाबत.
4 / 12
२३९९ रूपयांचा प्लॅन हा कंपनीच्या आकर्षक प्लॅन्सपैकीच एक आहे. यामध्ये ग्राहकांना ३६५ दिवसांची वैधता देण्यात येते. सोबतच ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो.
5 / 12
यामध्ये सोबतच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसही देण्यात येतात. याशिवाय ग्राहकांना एका वर्षाचं Zee5 चं प्रिमिअम सबस्क्रिप्शनही मिळतं.
6 / 12
याशिवाय कंपनी ग्राहकांना विकेंड डेटा रोलओव्हर, फ्री नाईट डेटा आणि Vi Movies & TV Classic चं मोफत अॅक्सेस देते.
7 / 12
२५९५ रूपयांच्या प्लॅनची किंमत यापूर्वीच्या प्लॅनपेक्षा थोडी जास्त असली तरी मिळणाऱ्या सुविधा मात्र २३९९ रूपयांसारख्याच आहेत. या प्लॅनसोबत ३६५ दिवसांची वैधता मिळते.
8 / 12
यासोबतच १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लॅनसह ग्राहकांना कंपनीकडून एका वर्षासाठी Zee5 आणि Disney+ Hotstar Vip सबक्रिप्शन मिळतं.
9 / 12
कंपनी या प्लॅनमध्ये ग्राहकांना विकेंड डेटा रोलओव्हर, फ्री नाईट डेटा आणि Vi Movies & TV Classic चीदेखील सुविधा देते.
10 / 12
कंपनीच्या २३९९ रूपये आणि २५९५ रूपयांच्या प्लॅनमध्ये जवळपास एकसारख्याच सुविधा देण्यात येतात. यामध्ये तितकीच वैधता, डेटा-कॉलिंग आणि एसएमएस देण्यात येतात.
11 / 12
दोन्ही प्लॅनमध्ये केवळ एकच फरक आहे. २३९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये कंपनीकडून एका वर्षासाठी Zee5 चं आणि २५९५ रूपयांच्या प्लॅनमध्ये कंपनीकडून एका वर्षासाठी Zee5 आणि Disney+ Hotstar Vip सबक्रिप्शन देण्यात येतं.
12 / 12
जर तुम्हाला Disney+ Hotstar Vip सबक्रिप्शन नको असेल तर तुम्ही १९६ रूपये कमी देऊनही २३९९ रूपयांचा प्लॅन घेऊ शकता.
टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाAirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओSmartphoneस्मार्टफोन