कोहली क्रिकेटच्या मैदानातच नाही तर बिझनेसमध्येही 'किंग'; तुम्हीही त्याचे ब्रँड वापरत असाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:25 IST
1 / 7रविवारी (२३ फेब्रुवारी) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून विराटने पुन्हा एकदा आपणच क्रिकेटमध्ये किंग असल्याचे दाखवून दिले. भारताला विजयापर्यंत नेणारा कोहली क्रिकेटचा बादशहा आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण तो एक यशस्वी उद्योगपतीही आहे हे तुम्हाला माहीत आहे का? कोहली अशा एका कंपनीचा सह-संस्थापक आहे, ज्याच्या ब्रँडचे कपडे प्रत्येक तरुणाला घालायचे आहेत. इतकंच नाही तर इतर अनेक कंपन्यांमध्येही त्याची मोठी भागिदारी आहे.2 / 7कोहलीच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर BCCI च्या 'A+' श्रेणीमध्ये येतो, जिथे त्याला वार्षिक फी म्हणून ७ कोटी रुपये मिळतात. याशिवाय प्रत्येक कसोटी सामन्यासाठी १५ लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी-२० साठी ३ लाख रुपये शुल्क आहे. त्याची आयपीएल फ्रँचायझी आरसीबी सध्या वार्षिक १५ कोटी रुपये देते.3 / 7फॅशन ब्रँड WROGN तुम्हालाही माहित असेल. पण, या कंपनीचा विराट कोहली सह-संस्थापक आहे का? आता हा ब्रँड त्यांच्या IPL फ्रेंचायझी RCB ला देखील स्पॉन्सर करतो. कोहलीने आणखी एका स्टार्टअप ब्लू ट्राइबमध्येही गुंतवणूक केली आहे. हा स्टार्टअप प्राण्यांच्या मांसाऐवजी वनस्पतींच्या मांसासारख्या आरोग्यदायी उत्पादनांची विक्री करतो.4 / 7कोहलीने मार्च २०२२ मध्ये दिल्लीस्थित कॉफी ब्रँड Rage Coffee मध्ये मोठी गुंतवणूक केली. याशिवाय, PUMA सारख्या जागतिक ब्रँडच्या सहकार्याने त्यांनी One8 हा स्पोर्ट्स ब्रँड सुरू केला. अलीकडेच या ब्रँडचा स्नीकर लॉन्च करण्यात आला. कोहलीने One8 Commune नावाची रेस्टॉरंट साखळीही सुरू केली आहे.5 / 7कोहलीने वेलनेस प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हायपरिसमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. याशिवाय २०१५ मध्ये त्यांनी ९० कोटी रुपयांची गुंतवणूक करून चिझेल फिटनेस चेन सुरू केली. तुम्हाला डिजिट इन्शुरन्सचे नाव माहित असेलच. यामध्येही कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का यांनी २.२ कोटी रुपयांची गुंतवणूक करून विमा क्षेत्रात प्रवेश केला.6 / 7२०२० मध्ये कोहलीने स्पोर्ट्स ब्रँड युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ प्रा. लि.मध्ये १९.३ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय २०१९ मध्ये बंगळुरूस्थित स्टार्टअप कंपनी गॅलॅक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. मध्ये त्यांनी ३३.४२ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. विराट आणि अनुष्काने दिल्लीतील आरके पुरममध्ये नुएवा रेस्टॉरंट नावाचे रेस्टॉरंटही सुरू केले आहे.7 / 7विराट कोहलीने इंडियन सुपर लीगमध्ये भाग घेणाऱ्या FC गोवा या फुटबॉल क्लबमध्ये १२% मालकी विकत घेतली आहे. २०१४ मध्ये, विराटने टेक स्टार्टअप स्पोर्ट्स कॉन्व्होमध्ये गुंतवणूक केली, जे चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. विराटने अलीकडे UAE स्टार्टअप टीम ब्लू रायझिंगमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.