शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Chanda Kochhar: ICICI बँकेत ट्रेनी ते CEO, आता ३ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, कोण आहेत चंदा कोचर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 1:52 PM

1 / 6
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना शुक्रवारी ३ हजार कोटी रुपयांच्या कथित कर्जाच्या अफरातफरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आपल्या पदाचा दुरुपयोग करून व्हिडीयोकॉनला चुकीच्या पद्धतीने ३ हजार २५० रुपयांचे कर्ज दिल्याचा आरोप आहे.
2 / 6
एका व्हिसल ब्लोअरने आरोप केला की, या डिलमुळे चंदा कोचरचे पती आणि त्यांच्या कुटुंबाला लाभ मिळाला होता. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कॉलेजमध्ये टॉपर राहिलेल्या चंदा कोचर ह्या आज एवढ्या मोठ्या घोटाळ्याच्या आरोपामध्ये कशाकाय तुरुंगात गेल्या आहेत.
3 / 6
१९६१ मध्ये राजस्थानमधील जोधपूर येथे जन्मलेल्या चंदा कोचर यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतील जयहिंद कॉलेजमधून पूर्ण केले होते. त्यानंतर इंस्टिट्युट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडियामधून कॉस्ट अकाऊंटसीचं शिक्षण घेतलं होतं. येथे त्यांना सर्वाधिक गुण आणि सुवर्णपदक पटकावले होते. पुढे त्यांनी मुंबईतील जमनालाल बजाज इंस्टिट्युटमधून मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीजची पदवी घेतली. तिथे त्यांनी बॅचमधून अव्वल क्रमांक पटकावला होता.
4 / 6
१९८४ मध्ये त्यांनी आयसीआयसीआय लिमिटेडमध्ये एक मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम सुरू केले होते. तेव्हा आयसीआयसीआय बँक कमर्शियल बँकिंगच्या क्षेत्रात नव्हती. मात्र १९९३ मध्ये आयसीआयसीआय बँक बनली आणि १९९४ मध्ये चंदा कोचर यांना असिस्टंट जनरल मॅनेजर बनवण्यात आले. त्यानंतर त्या १९९६ मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर आणि १९९८ मध्ये जनरल मॅनेजर बनल्या.
5 / 6
२०००मध्ये बँकेने चंदा कोचर यांच्या नेतृत्वात आयसीआयसीआय बँकेने रिटेल बँकिंगमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर ५ वर्षांच्या आत बँक देशातील सर्वात मोठ्या रिटेल फायनान्सरपैकी एक बनली. २००६ मध्ये त्यांना बँकेच्या डेप्युटी डायरेक्टर बनवण्यात आले. त्यानंतर २००९ मध्ये एमडी आणि सीईओपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले.
6 / 6
२०२२ मध्ये त्या पदावर असताना व्हिडीओकॉनला लोन देण्यात आले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारी ती कंपनी नॉन परफॉर्मिंग अॅसेट बनली. त्यावर्षी जानेवारीमध्ये एका कमिटीने चंदा कोचर यांनी कर्ज मंजूर करताना बँकेच्या नियमावलीचे पालन न केल्याचे समोर आणले. त्यानंतर कोचर यांना त्यांचे पद आणि कंपनीतून बडतर्फ करण्यात आले होते. चंदा कोचर यांचा राजीनामा हेच बडतर्फीचे कारण सांगितले गेले.
टॅग्स :Chanda Kochharचंदा कोचरICICI Bankआयसीआयसीआय बँकbusinessव्यवसाय