शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Top-10 Billionaires Net Worth: गौतम अदाणींच्या संपत्तीत प्रचंड वाढ; मुकेश अंबानी 10व्या क्रमांकवर घसरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 21:19 IST

1 / 6
Net Worth: जगातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा एकदा भारतीय उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत गौतम अदानी यांचा दबदबा वाढत आहे. टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत अदानींनी 5व्या स्थानावर झेप घेतली आहे. या यादीत मुकेश अंबानी सध्या 10व्या क्रमांकावर आहेत. म्हणजेच या दोघांच्या क्रमवारीत दुप्पट अंतर निर्माण झाले आहे.
2 / 6
गौतम अदानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे त्यांच्या नेटवर्थवरही मोठा परिणाम झाला आहे. संपत्तीत झालेल्या या वाढीमुळे अदानी पुन्हा एकदा 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, अदानींची एकूण संपत्ती $102.2 बिलियनवर पोहोचली आहे.
3 / 6
टॉप-10 अब्जाधीशांमध्ये दुसरे भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी 10व्या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाइम यादीनुसार, त्यांची एकूण संपत्ती $89.7 अब्ज आहे. त्यानुसार अदानींची संपत्ती अंबानींच्या संपत्तीपेक्षा 12.5 अब्ज डॉलर्स अधिक झाली आहे.
4 / 6
एलोन मस्क, बर्नार्ड अर्नाल्ट, जेफ बेझोस आणि बिल गेट्स हे जगातील अब्जाधीशांमध्ये आता गौतम अदानी यांच्या पुढे आहेत. मस्क 221.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत, तर जेफ बेझोस दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. त्यांची संपत्ती $135.3 बिलियनवर पोहोचली आहे. बर्नार्ड अर्नाल्ट दुसऱ्या क्रमांकावर गेले असून, त्यांची एकूण संपत्ती $147.9 अब्ज झाली आहे.
5 / 6
इतर अब्जाधीशांच्या बाबतीत बोलायचे झाले तर बिल गेट्स 124.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत, तर वॉरेन बफे सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरले आहेत. त्यांच्या जागी लॅरी एलिसन 96.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर आले आहेत. बफेची एकूण संपत्ती $96.3 अब्ज इतकी खाली आली आहे.
6 / 6
अव्वल श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेल्या लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांच्या संपत्तीत घट झाली आहे. 94.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह लॅरी पेज आठव्या क्रमांकावर आहे, तर 90.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक सर्जे ब्रिन नवव्या स्थानावर आहेत.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीAdaniअदानीBill Gatesबिल गेटसelon muskएलन रीव्ह मस्क