1 / 8Gold Silver Price: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सकाळपासून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज सकाळपासूनच एमसीएक्स एक्सचेंजवर चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.2 / 8एमसीएक्सवर आज मंगळवारी, ५ जून २०२४ रोजी डिलिव्हरीसाठीचे सोने प्रति १० ग्रॅम ७१,९१९ रुपयांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. सकाळपासून सोन्यात घसरण दिसून येत आहे. 3 / 8Gold Silver Price: आज सकाळी सोने घसरणीसह उघडले. तर उद्या, ५ ऑगस्ट २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव घसरला आणि ७२,२१८ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे.4 / 8एमसीएक्सवर मंगळवारी ५ जुलै 2024 रोजी डिलिव्हरीसाठी चांदी ९४,६४८ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. तर ५ सप्टेंबर २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी चांदी ९६,३९९ रुपयांच्या पातळीवर वाढून व्यवहार करत आहे. 5 / 8तर ५ डिसेंबर २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी चांदी १५० रुपयांनी वाढली आहे आणि आज ९८,६१५ रुपयांवर व्यवहार करत आहे.6 / 8Gold Silver Price: आज जागतिक पातळीवर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत ०.७६ टक्क्यांनी वाढून २,३७४.७० डॉलर प्रति औंस झाली आहे. सोन्याची जागतिक स्पॉट किंमत प्रति औंस २,३५०.६६ डॉलरवर पोहोचली आहे.7 / 8 चांदीच्या जागतिक किमतीत आज वाढ झाली आहे. कॉमेक्सवर चांदीची फ्युचर्स किंमत ४.७६ टक्केने वाढून ३१.९५ डॉलर प्रति औंस झाली आहे. चांदीची जागतिक स्पॉट किंमत प्रति औंस ३१.७५ डॉलरवर पोहोचली आहे.8 / 8Gold Silver Price: गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी वाढ झाली. आज पुन्हा सोन्याची घसरण झाली आहे. ७४ हजारांच्या आसपास असलेले सोन्याचे दर आता ७१ हजारांवर आली आहे.