शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंदीच्या काळात ‘भारत’ सावरतोय ‘इंडिया’ची अर्थव्यवस्था, बाजारात दिसतोय असा ट्रेंड

By बाळकृष्ण परब | Published: November 28, 2020 9:07 PM

1 / 9
भारताचे आर्थिक चित्र दर्शवताना शहरी भागाचा इंडिया तर छोटी शहरे आणि ग्रामीण भागाचा भारत असा उल्लेख केला जातो. इंडिया सधन तर भारत गरीब असे समजले जाते. मात्र यंदा आलेले कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे इंडियाची अर्थव्यवस्था कोलमडन मंदीच्या विळख्यात सापडली आहे. आता या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे काम भारतातून सुरू असल्याचे चित्र आर्थिक आघाडीवरच्या आकडेवारीतून दिसत आहे.
2 / 9
गेल्या काही काळात देशातील मेट्रो शहरांना मागे टाकत निमशहरी आणि ग्रामीण भारताने जोरदार खरेदी करत अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला असल्याचे दिसत आहे.
3 / 9
दसरा, दिवाळीच्या काळाता ऑनलाइन खरेदीचे जे रेकॉर्ड नोंदवले गेले ते रेकॉर्ड छोट्या शहरांच्या मदतीने बनल्याचे दिसत आहे. १५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या काळात ई-कॉमर्स कंपन्यांची तब्बल ६२ हजार कोटींची विक्री झाली. अपेक्षेपेक्षा २० टक्के अधिक विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे.
4 / 9
विक्रीमधील ही वाढ मेट्रो शहरांमधील खरेदीमुळे नाही तर छोट्या शहरांमधील खरेदीतील वाढीमुळे झाली आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या विक्रीमधील भागीदारीतून हा ट्रेंड दिसून येतो. मोठ्या शहरी भागात जोर असलेल्या अॅमेझॉनच्या विक्रीत ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर फ्लिपकार्टची या विक्रीतील भागीदारी ५८ टक्के राहिली आहे.
5 / 9
डिस्काऊंट, बँकांसोबतची भागीदारी आणि ईएमआयवरील विक्री, तसेच काही प्रॉडक्टच्या एक्सक्लूझिव्ह लाँचिंगमुळे विक्री वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
6 / 9
तसेच ग्रामीण भागाचा आणि छोट्या शहरांचा खरेदीमधील हा दबदबा केवळ ऑनलाइन शॉपिंगपुरता मर्यादित राहिला नाही. तर अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कार बाजारातही या भागांचा भरीव वाटा दिसून आला.
7 / 9
गेल्या काही दिवसांत देशातील कारची विक्री १७ टक्क्यांनी वाढली. मात्र गरीब समजल्या जाणाऱ्या राज्यांत ही वाढ २७ टक्के होती. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत ही वाढ २५ टक्के राहिली. श्रीमंत समजल्या जाणाऱ्या पश्चिम भारतात ही वाढ १९ टक्के, पूर्व भारतात १६ टक्के आणि दक्षिण भारतात केवळ ७ टक्के राहिली.
8 / 9
कारनिर्मात्या कंपन्यांच्या मते मिनी लॉकडाऊनसारख्या परिस्थितीमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला नसता तर विक्रीतील आघाडी अधिक वाढली असती. यावर्षीच्या चांगल्या मान्सूनमुळे ग्रामीण भागातील उत्पन्न वाढल्यामुळे ही तेजी आल्याचे सांगण्यात येत आहे.
9 / 9
ग्रामीण भागात सर्वाधिक एसयूव्हीची विक्री होत आहे. आथा कंपन्या या भागांमध्ये आपला दबदबा वाढवण्यासाठी अधिकाधिक शोरूम उघडत आहेत. याचाच अर्थ शेतीच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्था कमाल करू शकते. आता जर शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकारने अजून काही पावले उचलली तर पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.
टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसाय