शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:07 IST

1 / 9
शेअर बाजारातील Avantel Ltd कंपनीला डीआरडीओकडून ३.३६ कोटी रुपयांची एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. यासंदर्भातील माहिती कंपनीने एक्सचेन्ज सोबत शएअर केली आहे. या वर्क ऑर्डरचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून येत आहे.
2 / 9
बीएसईमध्ये हा स्टॉक १४९.८५ रुपयांवर खुला झाला होता. तो दिवसभरात २ टक्क्यांहून अधिकने वाढून १५२.२० रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला होता. बाजार बंद होताना कंपनीचा शेअर १५१.८५ रुपयांच्या पातळीवर होता. त्यात १.८४ टक्क्यांची वृद्धी झाली आहे.
3 / 9
कंपनीला मिळाले 3.36 कोटींचे काम - Avantel Ltd ला डीआरडीओकडून ३.३६ कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. कंपनीला सॅटकॉम वेव्हफॉर्मच्या (SATCOM Waveform) डेव्हलपमेंट, पोर्टिंग आणि टेस्टिंगचे काम मिळाले आहे.
4 / 9
यापूर्वी, कंपनीला ११ ऑगस्ट रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून १०.११ कोटी रुपयांचे काम मिळाले होते. म्हणजेच, या महिन्यात कंपनीला दुसरी मोठी ऑर्डर मिळाली आहे.
5 / 9
शेअर बाजारात कंपनीची कामगिरी - गेल्या ३ महिन्यांत कंपनीचा शेअर १८ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. तर ६ महिन्यांत या शेअर्सची किंमत ३५ टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
6 / 9
मात्र, एका वर्षांचा विचार करता, कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १४ टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १९०.९५ रुपये, तर ५२ आठवड्यांचा नीचांक ९०.३० रुपये एवढा आहे. तसेच कंपनीचे मार्केट कॅप ४०२३.५६ कोटी रुपये आहे.
7 / 9
10 वर्षांत दिला 11403% परतावा - गेल्या २ वर्षांत Avantel Ltd च्या शेअर्सच्या किमतीत ८६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ५ वर्षांत कंपनीच्या शेअरची किंमत २३६५ टक्क्यांनी वाढली आहे. तर, गेल्या १० वर्षांत, Avantel Ltd चा शेअर तब्बल ११४०३ टक्क्यांनी वधारला आहे.
8 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Stock Marketस्टॉक मार्केटInvestmentगुंतवणूकshare marketशेअर बाजार