सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:02 IST
1 / 8आजच्या बदलत्या जगात नोकरदार वर्गाला निवृत्तीची चिंता सतावताना दिसते. वाढती महागाई, आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती आणि नोकरीची अनिश्चितता ही यामागची मुख्य कारणे सांगता येतील. मात्र, वेळीच योग्य आर्थिक निर्णय घेतल्यास या समस्येवर सहज मात करणे शक्य आहे. यासाठी निवृत्तीचे सुरक्षित नियोजन आवश्यक आहे.2 / 8निवृत्तीच्या तयारीसाठी गुंतवणूकदारांना काही महत्त्वाच्या पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. यांपैकी एक म्हणजे, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP), दुसरे म्हणजे, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड (EPF) आणि तिसरे म्हणजे, नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS). हे असे पर्याय आहेत ज्यांमुळे आपला निवृत्तीचा काळ सुखकर होऊ शकतो.3 / 8सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) - आज एसआयपी गुंतवणुकीचे एक लोकप्रिय माध्यम बनले आहे. यात तुम्ही लहान रक्कमांमध्ये दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये वार्षाला सुमारे १२ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.4 / 8एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड (EPF) - नोकरदार मंडळींसाठी निवृत्तीचा हा एक सुरक्षित पर्याय आहे, जो स्थिर व्याजासह एकरकमी मोठी रक्कम निवृत्तीच्या वेळी उपलब्ध करून देऊ शकतो.5 / 8नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) - ही योजना दीर्घकाळ गुंतवणुकीद्वारे स्थिरता आणि चांगली वाढ देते. निवृत्तीच्या उद्दिष्टाने ही खास तयार करण्यात आलेली योजना आबे.6 / 8आपण अशा पद्धतीने करू शकतो गुंतवणूक - २० ते ३० वर्षे - या वयात जोखीम घेण्याची क्षमता अधिक असल्याने, SIP मध्ये सुमारे ६०-७० टक्के, EPF (अनिवार्य) आणि NPS मध्ये कमी भाग गुंतवू शकता.7 / 8३० ते ४० वर्षे - या टप्प्यात SIP आणि EPF मध्ये समतोल राखणे आवश्यक आहे, तसेच NPS मधील योगदान हळूहळू वाढवणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.8 / 8५० वर्षे अथवा त्याहून अधिक - या वयात SIP मधील गुंतवणूक कमी करून NPS आणि EPF मधील योगदान वाढवणे अधिक सुरक्षित मानले जाते.