याला म्हणतात स्टॉक...! ₹7 वरून ₹200 वर पोहोचला भाव; लोकांना केलं मालामाल, अजय देवगनकडेही 10 लाख शेअर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 18:15 IST
1 / 9भारतीय शेअर बाजरात अनेक कंपन्या लिस्टेड आहेत. यांतील बऱ्याच कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत. 2 / 9या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. महत्वाचे म्हणजे, या शेअरमध्ये बॉलीवुड स्टार अजय देवगनचीही गुंतवणूक आहे. हा शेअर आहे पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलचा. 3 / 9पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलचा शेअर गेल्या शुक्रवारी व्यवहारादरम्यान 10% पर्यंत वधारून 199.50 रुपयांवर पोहोचला. बॉलीवुड स्टार अजय देवगनची कंपनीत गुंतवणूक आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 1,400 कोटी रुपये एवढे आहे.4 / 9अजय देवगनजवळ 10 लाख शेअर्स - पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल हे चित्रपट निर्मिती, वितरण आणि प्रदर्शनाशी संबंधित एक मोठे नाव आहे. पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलने दृश्यम, द डिप्लोमॅट सारखे चित्रपट तयार केले आहेत. या कंपनीत अजय देवगणची १० लाख शेअर्ससह १.४१ टक्के एवढी हिस्सेदारी आहे. 5 / 9पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलचा शेअर आता १० रुपयांवरून सुमारे २०० रुपयांपर्यंत वाधारला आहे. अर्थात या शेअरवे आपल्या गुंतवणूकदारांना २७०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. 6 / 9जर एखाद्याने ५ वर्षांपूर्वी, म्हणजेच २४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रति शेअर ७.२२ रुपयांवर होता तेव्हा, या शेअरमध्ये १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज तिचे २.७ लाख रुपये झाले असते.7 / 9कंपनीचा शेअर - बीएसई अॅनालिटिक्सनुसार, गेल्या एका आठवड्यात कंपनीचा शेअर १२.५ टक्क्यांनी वधारला आहे. तर गेल्या एका वर्षात ३४ टक्क्यांनी वधारला आहे. या शेअरने गेल्या दोन वर्षांत ६०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. 8 / 9गेल्या तीन वर्षांचा विचार करता, हा शेअर १५९० टक्क्यांनी वधारला आहे. तर गेल्या ५ वर्षांत, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल २५०० टक्क्यांचा परतावा दिला आहे.9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)