याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:42 IST
1 / 10शेअर बाजाराचा खेळ, हा अत्यंत धोक्याचा खेळ मानला जातो. येथील काही शेअर आपल्या गुंतवणूकदारांना झटक्यात मालामाल करतात. तर काही राजाचा रंकही बनवतात...2 / 10जर आपण योग्य वेळी, योग्य शेअरमध्ये गुंतवणूक केली आणि नशिबाची साथ लाभली तर, आपले दिवस पालटायला वेळ लागत नाही. आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअर संदर्भात माहिती देणार आहोत. 3 / 10या शेअरने, शेअर बाजारात धमाल केली आहे. गेल्या केवळ पाच वर्षांतच या शेअरने 36,900 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. 4 / 10शेअरने केलं मलामाल - या कंपनीचे नाव म्हणजे, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स. ही कंपनी भारताच्या रियल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात कार्यरत आहे. 5 / 10रस्ते निर्माण आणि रिअल इस्टेट उद्योगातील या कंपनीचा, या वर्षातील अर्थात 2025 मधील शुद्ध नफा 40 कोटी रुपये एवढा होता. जो गेल्या वर्षाच्या तुलनेत 37 टक्क्यांनी कमी होता. गेल्या वर्षी कंपनीचा नफा जवळपास 64 कोटी रुपये एवढा होता. 6 / 102025 च्या मार्च तिमाहीत कंपनीचा नफा 17 कोटी रुपये एवढा होता, जो वर्षिक आधारावर 68.52 टक्क्यांनी कमी होता. तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा नफा 54 कोटी रुपये एवढा होता.7 / 10शेअरनं अशी घेतली रॉकेट स्पीड - खरे तर, या कंपनीच्या शेअरचा भाव जुलै 2020 मध्ये 0.12 रुपये एवढा होता. मात्र आता कंपनीचा शेअर 44.43 रुपयांवर पोहोचला आहे. 8 / 10जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता तिचे मूल्य ३ कोटी ७० लाख रुपये एवढे झाले असते. 9 / 10अर्थात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात जबरदस्त परतावा दिला आहे.10 / 10(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)