याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:42 IST
1 / 8शेअर बाजारात आज एमआरएफ लिमिटेड (MRF) या टायर कंपनीचा शेअर, फोकसमध्ये होता. हा शेअर आज १४४८५८.७५ रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला. 2 / 8या शेअरचा गत बंद भाव १४११०८.६५ रुपये एवढा होता. अर्थात आज एकाच दिवसात हा शेअर जवळपास ३,७५० रुपयांनी वधारला आहे. यात तीन टक्क्यांपर्यंतची तेजी दिसून आली आहे.3 / 8गेल्या एका वर्षाचा विचार करता, या काळात या शेअरने ₹१,०२,१२४ च्या नीचांकाला आणि ₹१,५३,००० च्या उच्च पातळीलाही स्पर्श केला आहे. जवळपास ₹६०,६०० कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेली ही कंपनी टायर सेक्टरमधील सर्वात मोठा प्लेयर आहे.4 / 8जून तिमाहीचे निकाल - एमआरएफ लिमिटेड या टायर उत्पादक कंपनीने ऑगस्ट महिन्यात जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर १२ टक्क्यांनी घसरून ५०० कोटी रुपये झाला. तत्पूर्वी, कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या एप्रिल-जून तिमाहीत ५७१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. 5 / 8एमआरएफ लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०२५ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल ७,६७६ कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी ७,१९६ कोटी रुपये होता.6 / 8आर्थिक बाबींसंदर्भात बोलायचे झाल्यास, याचे P/E प्रमाण जवळपास ३३–३४ पट, तर P/B प्रमाण जवळपास ३.२ पट आहे. हे या शेअरला प्रीमियम व्हॅल्यूएशनवर ट्रेड करताना दर्शवते. 7 / 8तसेच डिव्हिडेंड यील्ड देखील कमी (०.१७%) आहे. तथापी जुलै २०२५ मध्ये कंपनीने ₹२२९ प्रति शेअर एढा डिव्हिडेंड घोषित केला होता. 8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)