शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून अनेक नियमांमध्ये होणार मोठा बदल, करोडो लोकांना बसणार फटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 3:54 PM

1 / 7
नवी दिल्ली : काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होत असून अनेक बदलांसह नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. बँक लॉकर, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यासोबतच गॅस सिलिंडरच्या किमती आणि वाहनांच्या किमतीही वाढू शकतात. या सर्व बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून काय बदल होणार आहेत? ते जाणून घ्या...
2 / 7
नवीन वर्षात कारचे दर वाढणार आहेत. Maruti Suzuki, Hyundai Motor, Tata Motors, Mercedes-Benz, Audi, Renault, Kia India आणि MG Motor या गाड्यांच्या किंमती 1 जानेवारी 2023 पासून वाढण्याचे संकेत आहेत.
3 / 7
1 जानेवारीपासून रिझर्व्ह बँक सर्व लॉकरधारकांना एक करार जारी करेल आणि त्यावर ग्राहकांना स्वाक्षरी करावी लागेल. आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, बँका त्यांच्या लॉकर करारामध्ये काही अयोग्य अटी आणि अटी आहेत की नाही, हे ठरवतील.
4 / 7
क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहे. एचडीएफसी बँक रिफंड पॉइंट आणि फी देखील बदलणार आहे. याशिवाय, एसबीआयने काही कार्डचे नियम बदलण्याचा निर्णयही घेतला आहे.
5 / 7
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करतात किंवा वाढवतात.
6 / 7
1 जानेवारीपासून जीएसटीचे नियमही बदलणार आहेत. 5 कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांसाठी आता ई-इनव्हॉइस तयार करणे आवश्यक असणार आहे.
7 / 7
याचबरोबर, 1 तारखेपासून प्रत्येक मोबाईल उत्पादक आणि त्याच्या आयात व निर्यात कंपनीसाठी प्रत्येक मोबाईलच्या IMEI नंबरचे रजिस्ट्रेशन आवश्यक असणार आहे.
टॅग्स :businessव्यवसायbankबँकCylinderगॅस सिलेंडरGSTजीएसटीcarकार