शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर मिळणार अधिक व्याज, या बँका देताहेत खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 3:47 PM

1 / 7
कोरोना विषाणूच्या संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरांमध्ये सातत्याने कपात केली होती. त्यानंतर खासगी आणि सरकारी क्षेत्रातील बँकांनी बचत आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केले होते. याचदरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही प्रमुख बँकांनी एफडी योजना सुरू केली आहे.
2 / 7
अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फिक्स डिपॉझिट स्किम आणत असतात. या योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्याच्या टर्म डिपॉझिटच्या दरापेक्षा अधिक व्याज मिळते. कोरोना विषाणूच्या साथीमुळे ही विशेष एफडी योजना सर्वात आधी मे २०२० मध्ये सुरू करण्यात आली होती.
3 / 7
दरम्यान, सातत्याने कमी होत असलेल्या व्याजदरांच्या या काळात ज्येष्ठ नागरिकांना चांगला व्याजदर देण्याचा बँकांचा प्रयत्न आहे. या विशेष एफडी योजनांच्या सुरुवातीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२१ आहे.
4 / 7
भारतीय स्टेट बँक वरिष्ठ नागरिकांसाठीच्या या विशेष योजनेंतर्गत सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत ८० बेसिस पॉईंट अधिक व्याज देते. सद्यस्थितीत एसबीआय सर्वसामान्य ग्राहकांना पाच वर्षांच्या एफडीवर ५.४ टक्क्यांच्या दराने व्याज देत आङे. मात्र जर कुणी ज्येष्ठ नागरिकाने एसपीयआयमध्ये पाच वर्षांची एफडी केली. तर त्यांना यावर ६.२० टक्के दराने व्याज मिळेल.
5 / 7
खासगी क्षेत्रातील ही बँक ज्येष्ठ नागरिकांना ७५ बेसिस पॉईंट अधिक दराने व्याज देते. जर कुणी ज्येष्ठ नागरिक एचडीएफसी बँकेत ५ वर्षांसाठी एफडी करत असेल तर त्यांना ६.२५ टक्के दराने व्याज मिळेल.
6 / 7
ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बँक ८० बेसिस पॉईंटच्या अधिक दराने एफडी ऑफऱ करत आहे. आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स एफडी स्कीम अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ६.३० टक्के दराने व्याज मिळत आहे.
7 / 7
सरकारी क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना १०० बेसिस पॉईंटपेक्षा अधिक दराने व्याज ऑफर करत आहे. या स्किम अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ५ ते १० वर्षांदरम्यान, एफडीवर ६.२५ टक्के दराने व्याज मिळेल.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकBanking Sectorबँकिंग क्षेत्रMONEYपैसा