जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 09:06 IST
1 / 7Elon Musk Package: टेस्लाच्या जवळपास ७५% भागधारकांनी इलॉन मस्कसाठी तयार केलेल्या एका मोठ्या पे पॅकेजला मंजुरी दिली आहे. टेस्ला बोर्डानं एक असं परफॉर्मन्स-आधारित इन्सेन्टिव्हची रचना तयार केली आहे, ज्यामध्ये जर कंपनीनं काही विशिष्ट आर्थिक उद्दिष्ट्ये गाठली, तर मस्क यांना अब्जावधी डॉलर्सचे शेअर्स मिळतील.2 / 7या बोनस पॅकेजमुळे मस्क यांची वैयक्तिक संपत्ती १ ट्रिलियन डॉलर्सच्या (१००० अब्ज डॉलर) पुढे जाऊ शकते. हा कोणत्याही कंपनीच्या इतिहासातील एका सीईओला मिळणारं सर्वात महागडं पॅकेज आहे. मस्क यांना मिळणारी ही रक्कम सिंगापूर, यूएई, स्वित्झर्लंड, स्वीडन, नॉर्वे, हाँगकाँग, कतार आणि न्यूझीलंड या आनंदी देशांच्या जीडीपी पेक्षाही अधिक असेल.3 / 7या पॅकेजचा मुख्य उद्देश इलॉन मस्कना टेस्लाशी दीर्घकाळासाठी जोडून ठेवणं आहे. अलीकडेच मस्क यांनी इशारा दिला होता की, जर त्यांच्या पे पॅकेजच्या प्रस्तावाला टेस्लाच्या गुंतवणूकदारांनी मंजुरी दिली नाही, तर ते कंपनी सोडतील. बोर्ड सदस्यांनीही इलॉन मस्क यांना टेस्लासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं होतं, कारण कंपनी AI, रोबोटिक्स आणि ऑटोनॉमस टेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. बोर्डला हे नको होते की मस्कचे लक्ष या प्रकल्पांवरून विचलित व्हावे किंवा ते कंपनी सोडण्याचा विचार करतील.4 / 7पॅकेजमध्ये काय-काय समाविष्ट आहे? हे पे पॅकेज १२ भागांमध्ये विभागले गेले आहे. टेस्लानं पुढील दहा वर्षांमध्ये ठरवलेलं विशेष आर्थिक आणि ऑपरेशनल लक्ष्य पूर्ण केल्यावरच प्रत्येक भागाचा लाभ मिळेल. जर सर्व लक्ष्य साध्य झाली, तर मस्क यांना ४२३ मिलियनहून अधिक शेअर्स मिळतील, ज्यामुळे कंपनीमध्ये त्यांचा हिस्सा १३% वरून २५% पर्यंत वाढेल. याचा अर्थ मस्क टेस्लावर पूर्वीपेक्षा जास्त नियंत्रण मिळवतील.5 / 7बाजार मूल्याच्या (market value) हिशोबानं जर टेस्ला $८.५ ट्रिलियनच्या बाजार भांडवलापर्यंत (market cap) पोहोचली, तर या शेअर्सची किंमत जवळपास $१ ट्रिलियन असू शकते. म्हणजेच, पुढील दहा वर्षांमध्ये मस्कना दररोज सुमारे २७५ मिलियन डॉलर्स (२७.५ कोटी डॉलर) बरोबरीचा लाभ मिळू शकेल. वोटिंग संपल्यावर मस्क यांनी भागधारकांचे आभार मानले. मस्कना ही रक्कम तेव्हाच मिळेल जेव्हा तो आवश्यक ऑपरेशनल आणि आर्थिक लक्ष्ये साध्य करेल. या लक्ष्यांमध्ये १० वर्षांत २० दशलक्ष वाहनांचे उत्पादन समाविष्ट आहे. ही संख्या गेल्या १२ वर्षांत टेस्लाने उत्पादित केलेल्या वाहनांच्या दुप्पट आहे. त्यांना कंपनीचं बाजार मूल्य आणि ऑपरेटिंग नफा वाढवावा लागेल आणि दहा लाख रोबोट्सचा पुरवठा व्यवस्थापित करावा लागेल. टेस्लाने अद्याप कोणतेही रोबोट तयार केलेले नाहीत.6 / 7काही प्रॉक्सी सल्लागार कंपन्यांनी या पॅकेजला खूप मोठं सांगून त्याच्या विरोधात मतदान करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, बहुतेक भागधारक या गोष्टीवर सहमत होते की टेस्लाच्या भविष्यातील योजनांमध्ये मस्क यांचं नेतृत्व खूप महत्त्वाचं आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या बोर्डला हेदेखील वाटत होते की जर हे पॅकेज पास झाले नाही, तर मस्क कंपनी सोडण्याचा विचार करू शकतात, जे टेस्लासाठी अत्यंत धोकादायक पाऊल ठरलं असतं.7 / 7टेस्लावर मस्कची पकड अधिक मजबूत होईल, ज्यामुळे कंपनीची रणनीती आणि दिशा त्यांच्या व्हिजननुसार पुढे सरकेल. भागधारकांना अपेक्षा आहे की AI, रोबोटिक्स आणि सेल्फ-ड्राइव्हिंग टेक्नॉलॉजीमध्ये मोठे पाऊल उचलून टेस्ला येणाऱ्या वर्षांमध्ये जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये सामील होऊ शकेल. दुसरीकडे, टीकाकारांचं म्हणणं आहे की एवढे मोठे पगाराचे पॅकेज कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर प्रश्नचिन्ह उभे करतो.