शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशातील सर्वात वृद्ध अब्जाधीश, एकेकाळी होते LIC एंजट; Forbes च्या यादीतही नाव, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 8:26 AM

1 / 11
नशिबावर आयुष्य सोडणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी काही निवडक लोक असे आहेत जे स्वतःचे नशीब स्वतःच्या हाताने लिहितात. त्यांचे वय किती किंवा त्यांची स्थिती काय आहे याने त्यांना काही फरक पडत नाही. अडचणी त्यांच्या प्रगतीच्या आड येत नाहीत. असेच एक नाव आहे सोनालिका ग्रुपचे मालक लक्ष्मण दास मित्तल.
2 / 11
देशातील तिसरी सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक सोनालिका ट्रॅक्टर्सची सुरुवात सोपी नव्हती. एका साध्या LIC एजंटनं या कंपनीचा पाया रचला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे की, एलआयसी एजंटनं पगारातील प्रत्येक पैसा वाचवून त्यांनी निवृत्तीच्या वयात या कंपनीची उभारणी केली.
3 / 11
कंपनी उभारण्यात मित्तल यांना वारंवार अपयशाला सामोरे जावे लागले. त्याचं दिवाळंही निघालं, पण असं म्हणतात की मनापासून काही केलं तर यश नक्कीच मिळतं. सोनालिका ग्रुपचेही तेच झाले. आज या यशामागील खऱ्या संघर्षाची कहाणी जाणून घेऊया.
4 / 11
लक्ष्मण दास मित्तल(Laxman Das Mittal) अशा लोकांपैकी एक आहेत जे स्वतःचे भाग्य स्वतः लिहिलं. ज्या वयात लोक आराम करण्याच्या मूडमध्ये असतात, त्या वयात त्यांनी करोडोंची कंपनी उभी केली आहे.
5 / 11
वयाच्या ९२ व्या वर्षी लक्ष्मण दास मित्तल हे भारतातील दुसरे सर्वात वयस्कर अब्जाधीश आहेत. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे २.५ अब्ज डॉलर्स आहे. एका साध्या LIC एजंटपासून त्यांनी अब्जाधीशांपर्यंतचा प्रवास केला आहे.
6 / 11
मित्तल यांना अनेकदा अपयश आले, व्यवसाय दिवाळखोरीत निघाला, पण हार न मानण्याचा त्यांचा निर्धार होता. पंजाबमधील होशियारपूर येथे १९३१ मध्ये जन्मलेले लक्ष्मण दास मित्तल यांचे वडील हुकुम चंद अग्रवाल मंडीमध्ये धान्य व्यापारी होते.
7 / 11
लक्ष्मण दास मित्तल नेहमी अभ्यासात अव्वल होते. त्यांनी इंग्रजीमध्ये सुवर्णपदक मिळवले. शिक्षणानंतर त्यांनी १९५५ मध्ये LIC एजंट म्हणून नोकरी सुरू केली, परंतु त्यांच्या मनात नेहमीच काहीतरी वेगळे होते. स्वतःचे काही काम करता यावे म्हणून ते त्यांच्या पगारातून काही रक्कम वाचवत असे.
8 / 11
लहानपणापासूनच त्यांचा शेती आणि शेतकर्‍यांशी संबंध होता, त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी काम करण्याची त्यांची इच्छा होती. सुरुवातीच्या काळात मित्तल यांनी शेतीपासून मशिनशी संबंधित व्यवसायात पैसे गुंतवले. नोकरीसोबतच त्यांनी १९६२ साली थ्रेशर बनवण्यास सुरुवात केली, मात्र यश मिळू शकले नाही. व्यवसायात मोठे नुकसान झाले आणि त्यांचा व्यवसाय दिवाळखोरीत निघाला.
9 / 11
हे नुकसान इतके मोठे होते की त्याची आर्थिक झळ कुटुंबापर्यंत पोहोचली. त्यांच्या वडिलांनी हिंमत गमावली, परंतु लक्ष्मण यांनी पुन्हा प्रयत्न केला. १९९० मध्ये त्यांची पदोन्नती झाली आणि ते LICE मध्ये डेप्युटी झोनल मॅनेजर झाले. नोकरीसोबतच त्यांनी पुन्हा व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.
10 / 11
सन १९७० मध्ये त्यांनी सोनालिका ट्रॅक्टर्सची पायाभरणी केली. परंतु ट्रॅक्टर निर्मितीचे काम १९९४ मध्ये सुरू झाले. सोनालिकाने वेग पकडला तेव्हा ते निवृत्त झाले होते. त्यांनी आपले पूर्ण लक्ष व्यवसायावर दिले. सोनालिकाने त्यांचे नशीब बदलले. या व्यवसायात त्यांना यश मिळू लागले.
11 / 11
आज सोनालिका समूहाची एकूण संपत्ती २३००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा भारतातील तिसरा सर्वात मोठा ट्रॅक्टर ब्रँड बनला आहे. देशाव्यतिरिक्त त्यांचा व्यवसाय ७४ देशांमध्ये पसरलेला आहे. कंपनी एका वर्षात ३ लाखांहून अधिक ट्रॅक्टर बनवते.
टॅग्स :businessव्यवसायLIC - Life Insurance CorporationएलआयसीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी