TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 11:05 IST
1 / 3ट्रम्प टॅरिफची देशातील आयटी कंपन्यांनी धास्ती घेतली आहे. कारण, बहुतेक आयटी कंपन्या अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांना सेवा देतात. याचा परिणाम त्यांच्या तिमाही निकालांवरही दिसून येतो. यामुळेच टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल आणि विप्रो सारख्या आघाडीच्या टीसीएस कंपन्यांनी पगारवाढीबाबत कठोर निर्णय घेतला आहे.2 / 3टीसीएसने एप्रिलमध्ये कोणतीही वेतनवाढ होणार नसल्याचे स्पष्ट आहे. पण, देशातील या सर्वात मोठ्या आयटी कंपनीने चालू आर्थिक वर्षातही सुमारे ४२ हजार प्रशिक्षणार्थींना नोकरीवर घेण्याची योजना आखली आहे. 3 / 3टीसीएसने ३१ मार्चपर्यंत त्यांचे कर्मचारी नोकरी सोडण्याचा दर १३.३ टक्के असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे ६,४३३ नवीन कर्मचारी कंपनीत जॉईन झाले आहेत. आता टीसीएसमध्ये ६,०७,९७९ कर्मचारी काम करतात. कंपनीने अद्याप कर्मचाऱ्यांच्या कपातीबद्दल काहीही सांगितलेले नाही.