नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 17:18 IST
1 / 10हे देश करमुक्त का आहेत, याचे सर्वात मोठे कारण त्यांच्याकडे असलेले नैसर्गिक संसाधनांचे मोठे साठे, विशेषतः तेल आणि वायू. याशिवाय, पर्यटन आणि विविध शुल्कांमधूनही त्यांना भरपूर उत्पन्न मिळते.2 / 10युएईमध्ये कोणताही उत्पन्न कर किंवा प्रत्यक्ष कर नाही. सरकार व्हॅट (VAT) आणि इतर शुल्कांमधून उत्पन्न मिळवते. तेल आणि जगभरातील पर्यटनावर (दुबई, अबू धाबी) यांची अर्थव्यवस्था आधारित आहे.3 / 10बहरीनमध्ये नागरिकांना उत्पन्न कर भरावा लागत नाही. येथील सरकार तेल आणि इतर नैसर्गिक संसाधनांमधून उत्पन्न मिळवते. येथील मजबूत बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रही अर्थव्यवस्थेला आधार देते.4 / 10कुवेतची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेलावर अवलंबून आहे. हा जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदार देशांपैकी एक आहे. तेलापासून मिळणाऱ्या प्रचंड उत्पन्नामुळे सरकारला नागरिकांकडून कर घेण्याची गरज नाही.5 / 10सौदी अरेबियामध्ये थेट कर प्रणाली नाही, लोकांना उत्पन्न कर भरावा लागत नाही. येथे व्हॅट आणि इतर शुल्कांसारख्या अप्रत्यक्ष करांमधून सरकारला मोठे उत्पन्न मिळते. यांची अर्थव्यवस्थाही तेलावर आधारित आहे.6 / 10पश्चिम गोलार्धात वसलेले बहामास हे पर्यटनाचे मोठे केंद्र आहे. येथील नागरिकांना उत्पन्न कर भरावा लागत नाही. सरकार पर्यटन आणि इतर अप्रत्यक्ष करांमधून आपल्या गरजा पूर्ण करते.7 / 10आग्नेय आशियातील इस्लामिक देश ब्रुनेई तेल आणि वायूच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथेही कोणताही उत्पन्न कर नाही. तेल आणि वायूच्या निर्यातीमुळे त्यांची अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे.8 / 10आखाती देश ओमानमध्येही तेल आणि वायूचे मोठे साठे आहेत, जे त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहेत. ओमानमधील लोकांना उत्पन्न करातून पूर्णपणे सूट आहे.9 / 10कतार हा लहान देश असला तरी तेल आणि वायू क्षेत्रात त्याचे वर्चस्व आहे. येथील लोकांना कोणताही उत्पन्न कर भरावा लागत नाही. सरकार तेल आणि वायूपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून देशाचा खर्च चालवते.10 / 10कतार हा लहान देश असला तरी तेल आणि वायू क्षेत्रात त्याचे वर्चस्व आहे. येथील लोकांना कोणताही उत्पन्न कर भरावा लागत नाही. सरकार तेल आणि वायूपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून देशाचा खर्च चालवते.