शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:27 IST

1 / 9
टाटा समूहातील एक प्रमुख कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या (Tata Investment Corporation)च्या शेअर्समध्ये सध्या जबरदस्त तेजी दिसत आहे. दरम्यान, कंपनीने या शेअरचे विभाजन (Stock Split) करण्याची घोषणा केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
2 / 9
हा शेअर मंगळवारी (३० सप्टेंबर २०२५) बी एस ई वर (BSE) इंट्रा-डे मध्ये ७ टक्क्यांहून अधिक वाढून ₹९५९६.७५ वर पोहोचला. हा या शेअरचा ५२ आठवड्यांच्या नवा उच्चांक आहे.
3 / 9
शेअर विभाजनाचा निर्णय - टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने या शेअरचे १:१० या प्रमाणात विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, ₹१० दर्शनी मूल्याचा (Face Value) एक शेअर आता प्रत्येकी ₹१ दर्शनी मूल्याच्या १० शेअर्समध्ये रूपांतरित होईल.
4 / 9
शेअर बाजाराच्या इतिहासात कंपनी पहिल्यांदाच असे विभाजन करत आहे. या शेअर विभाजनाची रेकॉर्ड डेट १४ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. अशा निर्णयामुळे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी शेअरचे मूल्य तुलनेने कमी होऊन, तो अधिक आकर्षक बनतो आणि बाजारातील त्याची तरलताही (Liquidity) वाढते.
5 / 9
5 वर्षांत दिलाय 1000% परतावा - टाटा इनव्हेस्टमेंट कॉरपोरेशनचा शेअर गेल्या पाच वर्षांत 1040 टक्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. टाटा समूहाच्या या मल्टीबॅगर कंपनीचा शेअर १ ऑक्टोबर २०२० रोजी ₹८४०.७५ वर होता. तो आज (३० सप्टेंबर २०२५) ₹९५९६.७५ वर पोहोचला आहे.
6 / 9
गेल्या चार वर्षांत या शेअरमध्ये 565 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. तर गेल्या तीन वर्षांत या शेअरने 315 टक्के परतावा दिला आहे.
7 / 9
एका वर्षाचा विचार करता, या शेअरने केवळ एका वर्षात ४० टक्के तर गेल्या सहा महिन्यांत तब्बल ५५ टक्क्यांचा परतावा दिला आहे.
8 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकbusinessव्यवसायMONEYपैसा