Jio ला टक्कर देण्यास TATA सज्ज! 5G क्रांतीसाठी ‘या’ कंपनीला १ हजार कोटींची खुली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 09:49 IST
1 / 13Reliance Jio च्या प्रवेशानंतर टेलिकॉम क्षेत्र ढवळून निघाल्यासारखे झाले. स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. Airtel ने 5G चाचण्या सुरू केल्यानंतर अलीकडेच मुकेश अंबानी यांनी Jio 5G ची घोषणा केली. यानंतर आता TATA ग्रुपही या क्षेत्रात उडी घेण्याच्या तयारीत आहे. 2 / 13भारतात ग्राहक ४जी नेटवर्क वापरत आहे. मात्र, अनेक कंपन्यांनी ५जी चे टेस्टिंग सुरू केल्याने लवकरच 5G सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आता TATA ग्रुपने एका कंपनीमधील २६ टक्के हिस्सा खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. 3 / 13Tata सन्सने टेलिकॉम इक्विपमेंट मेकर Tejas Network मध्ये कंट्रोलिंग हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या करारानंतर आता TATA ग्रुपचा 5G मध्ये प्रवेश होणार आहे. टाटा सन्सचे यूनिट Panatone Finvest Ltd हे तेजस नेटवर्कमधील मोठा हिस्सा खरेदी करणार आहे.4 / 13Tata सन्सने Tejas Network मधील २६ टक्के हिस्सा खरेदीसाठी १ हजार ०३८ कोटी रुपयांची खुली ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे. टाटा सन्सने तेजस नेटवर्कच्या कोट्यवधींचे पेड अप इक्विटी शेअर्स २५८ रुपये प्रति शेअर्सने खरेदी करण्याची ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे. 5 / 13Tata सन्सने दिलेल्या खुल्या ऑफरचा परिणाम शेअर बाजारातही पाहायला मिळाला. Tejas Network चा शेअर्स जवळपास ५ टक्क्यांनी वाढून ५१७.५० अंकांवर बंद झाला. याद्वारे टाटा सन्सच्या कंपनीकडे मोठी हिस्सेदारी येणार आहे.6 / 13TATA ग्रुप 5G नेटवर्कच्या जगतात क्रांती आणण्याच्या तयारीत आहे. सॉफ्टवेअर कॅपेबिलिटीबद्दल सांगायचे तर TCS च्या मदतीने हे काम करणे शक्य होईल. तर तेजस नेटवर्कच्या मदतीने हार्डवेअर सपोर्ट मिळेल.7 / 13TATA ग्रुप भारतात 5G साठी पूर्ण तयारीत आहे. रिपोर्टनुसार, तेजस नेटवर्क आणि टाटा सन्सकडून PLI स्कीम अंतर्गत इन्सेंटिव्हसाठी देखील अर्ज करण्यात आला आहे. तेजसच्या स्थापनेचा उद्देशच टेलिकॉम कंपन्यांना इक्विपमेंट्सचा पुरवठा करणे हा आहे.8 / 13अलीकडेच Bharti Airtel आणि TATA ग्रुपची कंपनी टीसीएसने भारतात ५जी नेटवर्कसाठी स्ट्रॅटिजिक पार्टनरशिपची घोषणा केली होती. टेलिकॉम कंपनी एअरटेल जानेवारी २०२२ पर्यंत भारतात 5G नेटवर्कच्या पायलट प्रोजेक्टवर काम सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.9 / 13एकीकडे Jio देशाला २जी मुक्त करत, 5G युक्त करण्याची घोषणा करत आहे. तर आता TATA ग्रुप देखील तेजसमध्ये हिस्सेदारी खरेदी करत जिओला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे, असे म्हटले जात आहे.10 / 13दरम्यान, आताच्या घडीला TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.11 / 13संरक्षण मंत्रालयाने ‘सी-295’ या ५६ मालवाहतूक विमानांच्या खरेदीसाठी स्पेनच्या एअरबस डिफेन्स अँड स्पेससोबत जवळपास २२ हजार कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. महत्वाचे म्हणजे ही विमाने भारतात बनविण्यात येणार असून टाटा सोबत मिळून एअरबस या विमानांचे उत्पादन करणार आहेत. 12 / 13या डीलमुळे येत्या काही वर्षांत भारतात ६ हजारांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच देशात हवाई क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान येणार आहे. संरक्षण मंत्रालयानुसार हा एकप्रकारचा पहिलाच असा प्रकल्प आहे ज्यामध्ये खासगी कंपनी लष्करासाठी विमान बनविणार आहे. 13 / 13आतापर्यंत हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडे ही जबाबदारी होती. आता पहिल्यांदा खासगी कंपनी लष्करासाठी लष्करी विमाने बनविणार आहे. अन्य विमाने टाटाच्या प्रकल्पात पुढील १० वर्षांत बनविण्यात येणार आहेत.