TATA ची Power बाज कामगिरी! १ हजारांहून जास्त EV चार्जिंग स्टेशन कार्यान्वित; १८० शहरांत सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 11:04 IST
1 / 12TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. TATA ग्रुप जगात सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात TATA ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.2 / 12TATA ग्रुपमधील Tata Motors इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आताच्या घडीला वर्चस्व गाजवत असून, टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. तसेच आगामी काही वर्षात आणखी १० इलेक्ट्रिक कार सादर करण्याचा मानस टाटा मोटर्स कंपनीने व्यक्त केला आहे. 3 / 12यातच देशातील सर्वात मोठी, खाजगी क्षेत्रातील एकात्मिक कंपनी Tata Power कंपनीने देशभरात १ हजार पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे (EV) चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क उभारले आहे. पर्यावरणपूरक गतिशीलतेच्या दिशेने भारताच्या वाटचालीमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा टाटा पॉवरने पार केल्याचे सांगितले जात आहे. 4 / 12Tata Power देशभरात १००० सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क ऑफिसेस, मॉल्स, हॉटेल्स, रिटेल आउटलेट्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी टाटा पॉवरच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि अखंडित ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध केली आहे.5 / 12Tata Power टाटा पॉवर ईझेड चार्जर्सच्या इकोसिस्टिममध्ये सार्वजनिक चार्जर्स, कॅप्टिव्ह चार्जर्स, बसेस/ताफ्यांसाठी चार्जर्स आणि घरगुती चार्जर्स यांच्या संपूर्ण मूल्य शृंखलेचा समावेश आहे. देशभरातील सर्व महामार्गांना ई-हायवे बनवण्यासाठी १० हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची कंपनीची योजना आहे.6 / 12Tata Power चे पहिले चार्जर्स मुंबईमध्ये इन्स्टॉल केले गेले होते आणि आता देशभरात जवळपास १८० शहरांमध्ये आणि अनेक राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर वेगवेगळ्या बिझनेस मॉडेल्समध्ये आणि विविध बाजारपेठ विभागांमध्ये टाटा पॉवरचे ईव्ही चार्जिंग पॉईंट्स उभारण्यात आले आहेत. 7 / 12इलेक्ट्रिक गाड्या वापरणारे लोक आपल्या गाड्या अगदी सहज व अतिशय सुविधाजनक पद्धतीने चार्ज करू शकतात. सार्वजनिक क्षेत्रात १ हजारांहून जास्त EV चार्जिंग पॉईंट्स यशस्वीपणे तैनात करत देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती आणण्याच्या वाटचालीतील आमच्या अनेक टप्प्यांपैकी पहिला आम्ही आता सुरू केला आहे. 8 / 12यामुळे Tata Power ही ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधा प्रदान करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ही इकोसिस्टिम विकसित करण्यासाठी आणि देशात सर्वात जास्त इलेक्ट्रिक गाड्यांचा उपयोग केला जाण्याला प्रोत्साहन देण्यामध्ये आमच्या अभिनव व सहयोगात्मक दृष्टिकोनाने लक्षणीय प्रभाव निर्माण केला आहे, असे सीईओ आणि एमडी डॉ. सिन्हा यांनी म्हटले आहे. 9 / 12Tata Power कंपनीने EV चार्जिंगच्या पायाभूत सुविधांच्या प्रसारासाठी ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (ओईएम) सोबत भागीदारी केली आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये आपल्या उपस्थितीचा विस्तार करणे हे या भागीदारीचे उद्धिष्ट आहे.10 / 12Tata Power ने आपल्या ग्राहकांसाठी आणि डीलर्ससाठी ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, एमजी मोटर्स इंडिया लिमिटेड, जग्वार लँड रोव्हर, टीव्हीएस आणि इतर अनेक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे.11 / 12Tata Power ने आपल्या ग्राहकांसाठी आणि डीलर्ससाठी ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, एमजी मोटर्स इंडिया लिमिटेड, जग्वार लँड रोव्हर, टीव्हीएस आणि इतर अनेक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे.12 / 12Tata Power कंपनीने EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर (ईव्हीसीआय) विकसित करण्यासाठी आयओसीएल, एचपीसीएल, आयजीएल, एमजीएल, विविध राज्य सरकारे यांना देखील सक्रिय सहयोग प्रदान करते.