शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 14:07 IST

1 / 8
Impact of Tariffs on Furniture: २५ सप्टेंबरच्या मध्यरात्री अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ अस्त्र चालवले. औषधींवर १०० टक्के तर फर्निचरवर ५० टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. याच्या झळा भारतातीला उद्योगांनाही बसणार आहेत.
2 / 8
डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध निर्माण क्षेत्राबरोबरच फर्निचर क्षेत्रालाही मोठा झटका दिला आहे. भारत जगभरात फर्निचरची निर्यात करतो. लाकडी, प्लॅस्टिक, बेंत आणि बांबूपासून तयार केल्या जाणाऱ्या फर्निचरची निर्यात भारतातून मोठ्या प्रमाणात होते.
3 / 8
भारतातून अमेरिका, फ्रान्स, नेदरलँड या देशात जास्त फर्निचरची निर्यात केली जाते. अशात मोठी बाजारपेठ असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच ५० टक्के टॅरिफ लावल्याने हा भारतासाठी झटका मानला जात आहे. भारताची फर्निचर निर्यात २०२२-२३ मध्ये ५ अरब डॉलर इतकी होती. २०२२-२३ मध्ये जगातील फर्निचर मार्केटचा आकार २३ अरब डॉलर इतका होता.
4 / 8
भारतीय फर्निचर उद्योग ६ टक्के दराने वाढत असून, त्यातच हा निर्णय घेतला गेल्याने फटका बसणार आहे. ट्रेड इकोनॉमिक्सच्या एका रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये भारतातून अमेरिकेत फर्निचर, लायटिंग, प्री फॅब्रिकेटेड बिल्डिंग या श्रेणीतील उत्पादनांची निर्यात १.१४ अरब डॉलर (१० हजार कोटी डॉलर) इतकी झाली होती.
5 / 8
जागतिक बँकेच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, भारताने ३२.४६ कोटी डॉलर इतके लाकडी फर्निचर निर्यात केले आहे. भारतातील फर्निचर उद्योग वाढत असताना एका मोठ्या बाजारपेठेने ५० टक्के टॅरिफ लादले आहे.
6 / 8
भारतातील नीलकमल लिमिटेड ही कंपनी अमेरिकेत वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचरची निर्यात करते. २०२३ मध्ये या कंपनीने ५५ ते ६० कोटी रुपयांच्या सामानाची निर्यात केली आहे.
7 / 8
गोदरेज इंटेरिओ ही कंपनीही विविध प्रकारच्या फर्निचर वस्तू तयार करते. अमेरिकेतील कंत्राटही या कंपनीला मिळतात. या कंपनीची अमेरिकेतील निर्यातीचे आकडे सार्वजनिक नाहीत, पण या कंपनीकडून कोट्यवधी रुपयांच्या फर्निचरची निर्यात केली जाते.
8 / 8
फेदरलाइट ही सुद्धा भारतातील आघाडीची फर्निचर क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी आहे. या कंपनीकडून अमेरिकेत वस्तुंची निर्यात केली जाते. शीला फोम (स्लीपवेल) ही कंपनीही जागतिक स्तरावर व्यवसाय करते. या कंपनीकडूनही अमेरिकेत मोठ्या प्रमाणात फर्निचरची निर्यात केली जाते. भारतातील इतरही कंपन्या अमेरिकेत फर्निचरची निर्यात करतात.
टॅग्स :Trade Tariff Warटॅरिफ युद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका