Success Story: एकेकाळी टाटा समूहात करायचे नोकरी, आज आहे ₹१७५९००००००० कोटींचं साम्राज्य; असं बदललं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 08:50 IST
1 / 8जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी हवी. जिद्दीला मेहनतीची जोड असेल तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकाल. आयआयटी किंवा आयआयएमसारख्या मोठ्या कॉलेजमधून शिक्षण न घेतलेल्या एका व्यक्तीच्या यशस्वी कारकीर्दीबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.2 / 8आपल्या मेहनतीनं आणि निष्ठेनं त्यांनी १,७५९ कोटी रुपयांची कंपनी उभी केली. ACKO जनरल इन्शुरन्स कंपनीचे संस्थापक आणि सीईओ वरुण दुआ यांची ही कहाणी आहे. वरुण यांनी २०१६ मध्ये ACKO ची सुरुवात केली. 3 / 8ही भारतातील पहिली डिजिटल विमा कंपनी आहे. ACKO थेट ग्राहकांना विमा विकते. अलीकडेच एसीकेओनं डिजिटल क्रॉनिक केअर मॅनेजमेंट कंपनी वनकेअरचं अधिग्रहण केलं आहे. वरुण दुआ यांच्या या यशस्वी प्रवासाबद्दल जाणून घेऊया.4 / 8वरुण दुआ यांनी १० वर्षांहून अधिक काळ वित्तीय क्षेत्रात काम केलं आहे. टाटा समूहातील टाटा एआयजी लाइफ इन्शुरन्स या कंपनीत ते चार वर्षे मार्केटिंग मॅनेजर होते. ACKO सुरू करण्यापूर्वी त्यांनी कव्हरफॉक्स इन्शुरन्समध्ये ३ वर्षांहून अधिक काळ सीईओ म्हणून काम केलं. नोव्हेंबर २०१० मध्ये त्यांनी GlitterBug Technologiesची सहस्थापना केली.5 / 8२०१६ मध्ये वरुण दुआ यांनी ACKOची पायाभरणी केली. आज ती भारतातील अग्रगण्य जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून परिचयाची आहे. वरुण दुआ यांच्या कंपनीनं २०२२-२३ या आर्थिक वर्षात १,७५९ कोटी रुपयांची कमाई केली, जे २०२१-२२ च्या तुलनेत ३१.९ टक्क्यांनी अधिक आहे. ACKO पूर्णपणे ऑनलाइन-आधारित मॉडेलवर कामकाज करते. म्हणजेच तुम्ही कंपनीची सर्व उत्पादनं आणि सेवा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वापरू शकता.6 / 8वरुण दुआ हे मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहे. एमआयसीएमध्येही त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांच्या कंपनीने आतापर्यंत जनरल अटलांटिक, एक्सेल, एलिव्हेशन कॅपिटल, एफपीजीए फॅमिली फाऊंडेशन आणि इतर कंपन्यांकडून सुमारे ४५० ते ४६० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक घेतली आहे.7 / 8 विमा सोपा, जलद आणि पारदर्शक व्हावा या कल्पनेतून वरुण दुआ यांनी ACKOची स्थापना केली. तंत्रज्ञानाचा वापर करून विमा खरेदी आणि दावा करण्याच्या अनुभवात बदल घडवून आणणारी कंपनी तयार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं.8 / 8ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्रॉडक्ट लाँच केल्यानंतर दोन वर्षांतच ACKOनं स्विगी, रेझरपे आणि क्रेड सारख्या २०० हून अधिक नवीन कंपन्यांना आपल्यासोबत जोडलं. कंपनी ८ लाखांहून अधिक ग्राहकांना विमा सेवा देत आहे. ACKOनं नेहमीच डिजिटल फर्स्ट दृष्टिकोन स्वीकारलाय. कंपनीनं आपली सर्व उत्पादनं आणि सेवा पूर्णपणे ऑनलाइन केल्या आहेत. यामुळे ग्राहकांना कोणत्याही ठिकाणाहून आणि केव्हाही विमा खरेदी आणि व्यवस्थापन करण्याची सुविधा मिळते. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि त्या साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या वरुण यांचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.