शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:56 IST
1 / 9खरे तर शेअर बाजारात, आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणारे अनेक शेअर आहेत. असाच एक शेअर म्हणजे 'टिळकनगर इंडस्ट्रीज'. दारू व्यवसायाशी संबंधित या कंपनीच्या शेअरची किंमत मार्च २०२० मध्ये १५ रुपये होती, जी ५ वर्षांनंतर ४५५ रुपयांवर पोहोचली आहे. 2 / 9आज, २२ जुलै २०२५ रोजी, या शेअरची जबदस्त चर्चा होत आहे. कारण ही कंपनी आता एका मोठ्या अधिग्रहणाच्या शर्यतीत आहे.3 / 9खरे तर सीएनबीसी-टीवी१८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, टिळकनगर इंडस्ट्रीज, पेर्नोड रिकार्डचा प्रसिद्ध व्हिस्की ब्रँड, इंपीरियल ब्लूच्या अधिग्रहणाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. 4 / 9या करारात इम्पीरियल ब्लूचे मूल्य सुमारे ४,००० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. कर्ज आणि इक्विटीच्या संयोजनाद्वारे या संभाव्य अधिग्रहणासाठी निधी उभारला जाणे अपेक्षित आहे. 5 / 9महत्वाचे म्हणजे, टिळकनगर इंडस्ट्रीजची बोर्ड बैठक २३ जुलै रोजी होणार आहे. या बैठकीत निधी उभारणीच्या प्रस्तावावर विचार केला जाईल. तथापि, टिळकनगर इंडस्ट्रीज आणि पेर्नोड रिकार्ड यांच्याकडून या अधिग्रहणासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.6 / 9शेअर्समध्ये तेजी - या अधिग्रहणाच्या वृत्तानंतर, मंगळवारी टिळकनगर इंडस्ट्रीजचा शेअर ८% ने वाढला आणि त्याने ४५५ रुपयांची पातळी ओलांडली. व्यवहारादरम्यान, शेअरची किंमत ४५८ रुपयांवर पोहोचली. 7 / 9४५८ रुपये हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. या समभागाचा ५२ आठवड्यांचा नीचांक २०५ रुपये एवढा आहे.8 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)