शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:18 IST

1 / 8
स्मॉलकॅप कंपनी आझाद इंजिनिअरिंगचे शेअर्स सध्या रॉकेट बनले आहेत. शुक्रवारी आझाद इंजिनिअरिंगचा शेअर १० टक्क्यांहून अधिक उसळी घेत १७९८ रुपयांवर पोहोचला.
2 / 8
कंपनीने अलीकडेच जपानच्या मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत ५ वर्षांचा एक दीर्घकालीन करार केला आहे. या कराराची किंमत ६५१ कोटी रुपये आहे. आता जागतिक ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
3 / 8
महत्वाचे म्हणजे, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आयपीओ येण्यापूर्वीच आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरवर डावा लावला होता.
4 / 8
२०५५ रुपयांचे लक्ष्य - जागतिक ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्सना 'खरेदी' रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज हाऊसने स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्ससाठी २०५५ रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. म्हणजेच, मागील बंद स्तरापासून आझाद इंजिनिअरिंगचे शेअर्स २८ टक्के उसळी घेऊ शकतात.
5 / 8
गेल्या सहा महिन्यांत आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये ३० टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १९२८ रुपये आहे, तर नीचांक ११२८.४० रुपये आहे.
6 / 8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक किती? - दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आयपीओपूर्वी ६ मार्च २०२३ रोजी आझाद इंजिनिअरिंगमध्ये ५ कोटी रुपये गुंतवले, त्याने कंपनीचे ४,३८,२१० शेअर्स घेतले. तेंडुलकरला हे शेअर ११४.१० रुपये प्रति शेअर दराने मिळाले.
7 / 8
आझाद इंजिनिअरिंगचा शेअर NSE वर ७२० रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर सचिन तेंडुलकरच्या ५ कोटींच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून ३१.५५ कोटी रुपये झाले. सचिन तेंडुलकरने कंपनीतील त्यांची गुंतवणूक कायम ठेवली आहे की, शेअर्स विकले आहे, यासंदर्भातील माहिती अद्याप मिळालेली नाही.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketस्टॉक मार्केट