₹2500 वरून आपटून थेट ₹218 वर आला हा शेअर! शुक्रवारी राहू शकतो फोकसमध्ये; अशी आहे स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 18:03 IST
1 / 8अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे शेअर शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान फोकसमध्ये राहतील. खरे तर, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत अनिल अंबानींच्या कंपनीचा तोटा कमी झाला आहे.2 / 8रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत त्याचा एकत्रित निव्वळ तोटा कमी होऊन 69.47 कोटी रुपये राहिला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 494.83 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.3 / 8महत्वाचे म्हणजे, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर गेल्या बुधवारी 2% पर्यंत घसरून 218.55 रुपयांवर बंद झाला होता. आज गुरुवारी स्वतंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद आहे.4 / 8काय म्हणते कंपनी? - रिलायन्स इन्फ्राने बुधवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या तिमाहीत त्याचे एकूण उत्पन्न वाढून 7256.21 कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 5645.32 कोटी रुपये एवढे होते. याशिवाय, जून तिमाहीत कंपनीचा खर्च वाढून 6799.30 कोटी रुपये एवढा झाला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 6372 कोटी रुपये एवढा होता.5 / 8रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर वीज, रस्ते, मेट्रो रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी अभियांत्रिकी आणि बांधकाम सेवा पुरवण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. 6 / 8अशी आहे शेअरची स्थिती रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर गेल्या एका महिन्यात 12% ने वधारला आहे. या शेअरने गेल्या एका वर्षात 35% एवढा परतावा दिला आहे. तर पाच वर्षांत 372% परतावा दिला आहे. या काळात हा शेअर 46 रुपयांवरून आताच्या किमतीवर पोहोचला आहे.7 / 8दीर्घकाळाचा विचार करता या शेअरने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान केले आहे. 2008 मध्ये या शेअरची किंमत साधारणपणे 2500 रुपये होती. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 308 रुपये तर नीचांक 143.70 रुपये आहे. तर कंपनीचे मार्केट कॅप 8,724.79 कोटी रुपये एवढे आहे.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)