शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 22:23 IST
1 / 9पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअरने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने गुंतवणूकदारांन मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये ११००० टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली. 2 / 9पाच वर्षांपूर्वी पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेडच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवून, ती गुंतवणूक आतापर्यांत ठेवणारे करोडपती झाले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी पाच वर्षात १ लाख रुपयांचे १ कोटीहून अधिक केले आहेत. 3 / 9पीजी इलेक्ट्रोप्लास्ट ही एक आघाडीची इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस (ईएमएस) कंपनी आहे. पीजी इलेक्ट्रोप्लास्ट एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, एलईडी टेलिव्हिजन, एअर कूलर आणि प्लास्टिक कंपोनंट्स बनवते.4 / 91 लाखाचे केले 1 कोटी - पीजी इलेक्ट्रोप्लास्टचा शेअर 4 सप्टेंबर 2020 रोजी 5 रुपयांवर होता. तो 12 सप्टेंबर 2025 रोजी BSE वर 570.05 रुपयांवर बंद झाला. साधारणपणे गेल्या 5 वर्षांत या शेअरमध्ये 11265 पर्सेंटहून अधिकची तेजी आली आहे. जर एखाद्या व्यक्तीने 4 सप्टेंबर 2020 रोजी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता तिची मूल्य 1.14 कोटी रुपये झाले असते.5 / 94 वर्षांत दिला 1490% हून अधिकचा परतावा - पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेडचा शेअर गेल्या चार वर्षांत 1490 टक्क्यांनी वधारला आहे. हा 9 सप्टेंबर 2021 रोजी 35.65 रुपयांवर होता. जो 12 सप्टेंबर 2025 रोजी BSE वर 570.05 रुपयांवर बंद झाला आहे. 6 / 9गेल्या तीन वर्षांचा विचार करता, हा शेअर 453 टक्क्यांनी वधारला. तर दोन वर्षांत या शेअरने 213 टक्क्यांचा परतावा दिला आहे. मात्र, गेल्या एका वर्षात कंपनीचा शेअर जवळपास 8 टक्क्यांनी घसरला आहे. 7 / 9पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1054.95 रुपये आहे. तर, 52 आठवड्याचा निचांक 471.15 रुपये एवढा आहे.8 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)