416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 23:19 IST
1 / 7येत्या आठवड्यात मिश्का एक्झिम लिमिटेडचे शेअर्स फोकसमध्ये असू शकतात. कंपनीने अलीकडेच जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४१६% वाढला आहे. याशिवाय, महसूलातही ४६% वाढ झाली आहे. 2 / 7गेल्या शुक्रवारी या पेनी स्टॉकमध्ये २०% ने वधारला होता. याला अप्पर सर्किट लागले होते आणि तो ४०.२८ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. तथापि, ५७.५ कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह मिश्का एक्झिम लिमिटेडचे शेअर ३९.०९ रुपयांवर बंद झाला. 3 / 7महत्वाचे म्हणजे, हा शेअर त्यांच्या ५२ आठवड्यांच्या ७०.५० रुपये प्रति शेअरच्या उच्चांकापेक्षा ४४ टक्के कमी आहे. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये ३०% वाढ झाली आहे. तर एका महिन्यात या शेअरमध्ये ४५% वाढ झाली आहे.4 / 7जून तिमाहीचे निकाल - मिश्का एक्झिमने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत ४६ टक्क्यांच्या वृद्धीसह २.०९ कोटी रुपये एवढा महसूल मिळाला. जो आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत १.४३ कोटी रुपये एवढा होता. या व्यतिरिक्त, तिमाही आधारावर, हा १.४९ कोटी रुपयांवरून ४० टक्के वाढला. 5 / 7कंपनीने आर्थिक वर्ष २५-२६ च्या पहिल्या तिमाहीत ४१६ टक्क्यांच्या वृद्धीसह १८.२३ लाख रुपयांचा शुद्ध नफा नोंदवला आहे. जो आर्थिक वर्ष २४-२५ च्या पहिल्या तिमाहीत ३.५३ लाख रुपये होता. या शिवया, हा नफा तिमाही आधारावर १२.३७ लाख रुपयांवरून ४७ टक्के वाढला. 6 / 7जून २०२५ पर्यंत, या व्यवसायात प्रमोटर्सचा वाटा ५८.७७ प्रतिशत होता. याशिवाय, सार्वजनिक शेअरधारकांकडे 41.22 टक्के एवढा वाटा आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)