याला म्हणतात 'मंदीतही चांदी'...! 1021 बसची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट; लोकांना केलं मालामाल, तगडा आहे कंपनीचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 23:45 IST
1 / 7शअर बाजारात मंदीचे वातावरण असतानाच बुधवारी जेबीएम ऑटो लिमिटेडचा शेअर रॉकेट बनला आहे. कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर १९% ने वाढून ₹६७४ वर पोहोचला आहे. व्यवहार बंद होताना हा शेअर १४.०८% च्य वाढीसह ६४६.२० रुपयांवर बंद झाला.2 / 7असे आहे ऑर्डर डिटेल्स - जेबीएम ऑटो लिमिटेडची उपकंपनी असलेल्या जेबीएम इकोलाइफ मोबिलिटीला पीएम ईबस सेवा योजना-II अंतर्गत ₹५५०० कोटींची ऑर्डर मिळाली आहे. 3 / 7जेबीएम इकोलाइफ मोबिलिटीने १०२१ इलेक्ट्रिक बसेसची खरेदी, पुरवठा, ऑपरेटिंग आणि देखभालीसाठी बस ऑपरेटर म्हणून काम करण्यासाठी टिंडर जिंकले आहे.4 / 7या प्रकल्पात ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) मॉडेलमध्ये विद्युत आणि नागरी पायाभूत सुविधांचा विकासही समाविष्ट आहे. या ऑर्डरअंतर्गत गुजरात, महाराष्ट्र आणि हरियाणातील १९ शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस पुरवल्या जातील. 5 / 7जेबीएम ऑटोने अद्यापपर्यंत, भारत, यूरोप, मध्य पूर्व आणि अफ्रीकेसह इतरही काही भागात जवळपास 2000 इलेक्ट्रिक बसेस तैनात केल्या आहेत. या नव्या ऑर्डरसह कंपनीचे ऑर्डर बुक आता 11,000+ इलेक्ट्रिक बसेसपर्यंत पोहोचले आहे. 6 / 7जेबीएमने दिल्ली-एनसीआर भागात जगातील सर्वात मोठी समर्पित इंटीग्रेटेड इलेक्ट्रिक बस उत्पादन सुविधा (चीन वगळता) स्थापन केली आहे. तिची २०,००० इलेक्ट्रिक बसेस एवढी वार्षिक उत्पादन क्षमता आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)