शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Stock Market Falls : शेअर बाजारात १००० अकांची घसरण; या कारणांमुळे बुडाले गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 5:01 PM

1 / 12
शेअर बाजारात (Share Market) नव्या आठवड्याची सुरूवात घसरणीचेच झाली. शेअर बाजाराच्या निर्देशांक सोमवारी इंट्राडेमध्ये 1,200 अंकांपेक्षा अधिक घसरून 57,424 च्या नीचांकी पातळीवर आला.
2 / 12
दुसरीकडे, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये विक्रीचा दबाव असताना निफ्टी 17,150 ची पातळी टिकवून संघर्ष करत होता.
3 / 12
सोमवारी बीएसई सेन्सेक्समध्ये मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. परंतु कामकाजाच्या अखेरच्या टप्प्यात बाजार सावरला आणि 1023.63 अंकांनी घसरून 57,621.19 वर बंद झाला.
4 / 12
दरम्यान आज बॉन्ड मार्केट आणि फॉरेन करन्सी बाजार बंद राहिला. दरम्यान, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने सोमवारी सरकारी बॉन्ड मार्केट आणि फॉरेन करन्सी मार्केट बंद ठेवण्याची घोषणा केली.
5 / 12
सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी म्हणजेच 3.63 टक्क्यांची घसरण एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये दिसून आली. या व्यतिरिक्त एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स सारख्या परदेशी गुंतवणूकदारांचे पसंतीचे शेअर्सदेखील 2.5 ते 3.5 टक्क्यांच्या घसरणीवर व्यवहार करत होते. शेअर बाजारातील आजच्या घसरणीमागे काही कारणंही होती.
6 / 12
'शेअर बाजारात कामकाजादरम्यान मोठी घसरण होत आहे. या घसरणीमागील मुख्य कारण म्हणजे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FII) विक्री, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे आणि अमेरिकन बॉन्ड यील्डमध्ये वाढ होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारातून पैसा बाहेर काढत आहे,' अशी प्रतिक्रिया स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे ​​संशोधन प्रमुख संतोष मीणा यांनी दिली.
7 / 12
आज घसरण झालेले सर्व शेअर्स हे FII च्या पसंतीचे शेअर्स आहेत. यामध्ये एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि कोटक बँक यांसारख्या हेवीवेट शेअर्सचा समावेश आहे.
8 / 12
एफआयआयच्या विक्रीमुळे हे समभाग तसेच बेंचमार्क निर्देशांक खाली आले आहेत. या काळात पीएसयू बँका, मेटल शेअर्स आणि शुगर स्टॉक्समध्ये चांगली खरेदी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
9 / 12
जर आपण देशांतर्गत संकेतांबद्दल बोललो तर, बजेट चांगले होते आणि कंपन्यांच्या डिसेंबर तिमाहीत कमाईची वाढ देखील चांगली होती. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे की, 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी बाजारात चिंता आहे का? निफ्टी त्याच्या 50-दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली घसरले जे चांगले लक्षण नाही, असेही त्यांनी नमूद केले.
10 / 12
तथापि 17,200 ही एक ठीक पातळी आहे जिथून आपण रिकव्हरीची अपेक्षा करू शकतो. जर तसे झाले नाही तर ते 17,000-16,800 च्या जवळपास जाऊ शकतो. परंतु सपोर्ट मिळाल्यास 17450-17500 आता एक मजबूत रेझिस्टन्सच्या रुपात काम करेल, असे मीणा म्हणाले.
11 / 12
याशिवाय अमेरिकेत व्याज दरवाढ ही देखील महत्त्वाचे आणि चिंतेचे कारण आहे. वाढती महागाई रोखण्यासाठी फेडरल रिझर्व्हवर दबाव वाढत आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेत 4.67 लाख नवे रोजगार तयार झालेत, असं मत जियोजित फायनॅन्शिअल सर्व्हिसेजचे (Geojit Financial Services) चीफ इन्व्हेस्टमेंट स्टॅटजिस्ट व्ही. के विजयकुमार यांनी व्यक्त केलं.
12 / 12
फेडरल रिझर्व्ह महागाई कमी करण्यासाठी पावलं उचलेल यात कोणतीही शंका नाही. जर फेडरल रिझर्व्हनं मार्चमध्ये व्याजदरात 0.50 टक्क्याची वाढ केली तर जगभरातील बाजारात मोठी घसरण दिसून येईल, असेही ते म्हणाले.
टॅग्स :share marketशेअर बाजारICICI Bankआयसीआयसीआय बँकhdfc bankएचडीएफसी