शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 17:20 IST

1 / 8
गेला आठवडा शेअरबाजारातील गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त ठरला. सेंसेक्स-निफ्टी जबरदस्त वधारले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर असलेला सेंसेक्स 1193.94 अंकांनी वधारत 1.47% ने वाढला.
2 / 8
यांतील टॉप टेन कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या बाजार मूल्यात, जबरदस्त वृद्धी झाली. यामुळे, यांत गुंतवणूक करणारे मालामाल झाले.
3 / 8
या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य 1,69,506.83 कोटी रुपयांनी वाढले आहे. गुंतवणूकदारांना मालामाल करण्याच्या बाबतीत सर्वात आघाडीवर रिलायन्स अथवा टाटा कंसल्टंन्सी सर्व्हिसेज नाही, तर बजाज समूहाची फायनान्स कंपनी आहे, जिच्या शअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची केवळ 5 दिवसांतच 40000 कोटींहूनही अधिक कमावले आहे.
4 / 8
बजाज फायनान्सची कामगिरी - गेला आठवडा रिलायन्स, टीसीएस, इंफोसिस ते एसबीआय पर्यंत कमाई करवणारा होता. मात्र, आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करण्याच्या बाबतीत बजाज फायनान्स सर्वात आघाडीवर राहिला.
5 / 8
बजाज फायनान्स कंपनीचे बाजारमूल्य आता 6,24,239.65 कोटी रुपये झाले आहे. गुंतवणूकदारांनी केवळ पाच व्यवहारांच्या दिवसांतच 40,788.38 कोटी रुपयांची तगडी कमाई केली आहे.
6 / 8
इतर महत्वाच्या शेअरर्सची कामगिरी - बजाज फायनान्सशिवाय, इतरही काही कंपन्यांनी या आठवड्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. इंफोसिसचे मार्केट कॅप. 33,736.83 कोटी रुपयांच्या वाढीसह 6,33,773.30 कोटी रुपयांवर पोहोचले.
7 / 8
तसेच, देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कंसल्टंन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)चे मार्केट कॅप 30,970.83 कोटींनी वाढून 11,33,926.72 कोटी रुपयांवर, तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप. 27,741.57 कोटी रुपयांनी वाढून 18,87,509.28 कोटी रुपये झाले आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा