शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली अन् 'या' शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली; झटक्यात 20% नं वाढला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 14:45 IST

1 / 7
मोदी ३.० चा अर्थसंकल्प शनिवारी (१ फेब्रुवारी) संसदेत सादर झाला. अर्थसंकल्पीय भाषणानंतर मिर्झा इंटरनॅशनल लिमिटेड या फुटवेअर कंपनीच्या शेअर्समध्ये २०% पर्यंत वाढ झाली होती. यानंतर, कंपनीचा शेअर ३८.२५ रुपयांच्या इंट्रा डे हाईवर पोहोचला होता.
2 / 7
शेअर्समध्ये ही वाढ होण्यामागील कारण म्हणजे निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेली एक घोषणा. खरे तर, भारत लेदर आणि इतर पादत्राणांच्या क्षेत्रात एक नवीन धोरण आणेल, असे अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या होत्या
3 / 7
असे आहेत डेटेल - पादत्राणे आणि चामडे क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या योजनेमुळे २२ लाख लोकांना रोजगार मिळेल, ४ लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक गुंतवणूक होईल आणि १.१ लाख कोटी रुपयांची निर्यात होईल, असे अर्थमंत्री आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या होत्या.
4 / 7
या घोषणेचा परिणाम मिर्झा इंटरनॅशनलच्या शेअर्सवरही झाला आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२४ साठी, मिर्झा इंटरनॅशनलने एकूण ६३० कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, यांपैकी ५१५ कोटी रुपये निर्यातीतून आले आहेत.
5 / 7
मिर्झा इंटरनॅशनलच्या वर्षिक अहवालात आर्थिक वर्ष २४ संदर्भात सांगण्यात आले आहे की, म्हटले आहे की, जागतिक आर्थिक परिस्थितीनुसार, मागील साध्य निर्यात व्यापाराच्याही पुढे जाण्याचा कंपनीचा मानस आहे.
6 / 7
कंपनीचा कारभार - मिर्झा इंटरनॅशनल लिमिटेड चामड्याची उत्पादने आणि चामड्याच्या पादत्राणांचे उत्पादन तथा मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 528 कोटी रुपये एवढे आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसाStock Marketशेअर बाजारshare marketशेअर बाजार