1 / 11आजही सर्वांना बँकांच्या एफडीमध्ये पैसे ठेवणे अधिक सुरक्षित वाटते. मात्र, सध्या सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकाही केवळ 6 टक्केच व्याजदर देत आहेत. यामुळे आता गुंतवणूकदार अधिक नफा मिळविण्यासाठी म्युचूअल फंडमध्ये पैशांची गुंतवणूक करत आहेत. 2 / 11काही दिवसांपूर्वी असोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स इन इंडियाकडून (AMFI) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 2020मध्ये एकूण फोलिओची (म्युचूअल फंडात उघडण्यात आलेल्या खात्यांना फोलिओ म्हणतात.) संख्या 9.43 कोटींच्याही पुढे गेली आहे. 3 / 112019 मध्ये म्यूचुअल फंड उद्योगाने 68 लाख फोलिओ जोडले होते. 4 / 11तज्ज्ञांच्या मते या काळात बँकिंग सेक्टरच्या SBI Banking & Financial Services Fund मध्ये पैसे लाऊन चांगला नफा मिळवला जाऊ शकतो. कारण येथे एका आठवड्यात 12 टक्कते आणि 6 महिन्यात 52 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळत आहेत. 5 / 11एखाद्याने गेल्या आठवड्यात 10 हजार रुपये यात गुंतवले असते, तर त्याला या आठवड्यात 11,162 रुपये मिळाले असते. तसेच 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने पैसे गुंतवले असते, तर त्याला आता 15,287 रुपये मिळाले असते.6 / 11...म्हणून बँकिंग सेक्टरमध्येच करायला हवी गुंतवणूक - अर्थसंकल्पानंतर स्थानिक शेअर बाजारातील महत्वाचे बेंचमार्क इंडेक्स सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रमी तेजी दिसून येत आहे. यात बँकिंग शेअरमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.7 / 11जग भरातील रेटिंग एजन्सिजचे म्हणणे आहे, की बँकिंग शेअर्समध्ये अशाच प्रकारची तेजी सुरू राहील. अशात आपल्याकडे चांगला नफा मिळविण्याची संधी आहे.8 / 11तज्ज्ञांच्या मते, अर्थसंकल्पात झालेल्या काही घोषणांमुळे बँकिंग सिस्टममध्ये वेगाने सुधारणा होईल. यामुळेच बीएसईच्या बँकिंग इंडेक्सने एका दिवसात 9 टक्क्यांची उसळी घेतली.9 / 11म्यूच्युअल फंड्सचा विचार करता, बँकिंग सेक्टर फंड्सने एका दिवसात 7.63 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर, वर्षभरातील खराब स्थितीनंतर, गेल्या तीन महिन्यांत या स्कीम्सनी 40 टक्के रिटर्न्स दिले आहेत. 10 / 11म्यूचुअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांच्या मते, येणाऱ्या काळात बँकिंग म्युचूअल फंड्सशी संबंधित योजनांमध्ये लवकर पैसे दुप्पट होण्याची संधी आहे.11 / 11अशा प्रकारच्या गुंतवणुकीतून आपणही लाभ मिळवू शकता.