शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Elon Musk यांची Starlink इंटरनेट सेवा भारतात सुरू होणार? कंपनीने मागितली परवानगी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 8:25 PM

1 / 5
Starlink India: इलॉन मस्क यांची सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सर्व्हिस कंपनी ‘स्टारलिंक’ लवकरच भारतात आपला व्यवसाय सुरू करू शकतके. कंपनीला लवकरच सरकारकडून ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट (GMPCS) लायसेन्स मिळू शकते. मस्क यांची कंपनी, सॅटेलाइटद्वारे तुमच्यापर्यंत हायस्पीड इंटरनेट देईल. स्टारलिंक सर्व्हिससाठी फायबर केबलसारख्या मोठ्या इंफ्रास्ट्रक्चरची गरज नसेल.
2 / 5
सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर स्टारलिंक देशात स्पेक्ट्रम मिळविण्यास पात्र होईल. कंपनी भारतीय ग्राहकांना ब्रॉडबँड सेवा पुरवणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टारलिंक डिपार्टमेंट ऑफ स्पेस, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि गृह मंत्रालयाकडून मंजुरी घेत आहे. काही आठवड्यांत सर्वांकडून मंजुरी अपेक्षित आहे.
3 / 5
स्टारलिंकने मंजुरी मागितली- इलॉन मस्क यांच्या मालकीच्या कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये GMPCS परवान्यासाठी अर्ज केला होता. याशिवाय कंपनीने नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) कडूनही मंजुरी मागितली आहे. भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी ही मान्यता आवश्यक आहे.
4 / 5
अशा प्रकारे तुम्हाला इंटरनेट सेवा मिळेल- मस्क यांची अंतराळ कंपनी SpaceX ने 42,000 हून अधिक उपग्रह अवकाशात सोडले आहेत. एकूण सक्रिय उपग्रहांमध्ये त्यांचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. स्टारलिंकमध्ये पृथ्वीवर कुठेही इंटरनेट पुरवण्याची क्षमता आहे. ते सॅटेलाईटद्वारे इंटरनेट सेवा पुरवतील.
5 / 5
SpaceX चा उपग्रह पृथ्वीपासून 550 किलोमीटर अंतरावर आहे, तर जुन्या पद्धतीने इंटरनेटसाठी वापरण्यात येणारे उपग्रह 35,000 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे स्टारलिंक चांगले कनेक्शन प्रदान करेल. इंटरनेट चालवण्यासाठी तुम्हाला स्टारलिंक डिश, वाय-फाय राउटर/वीज पुरवठा, केबल आणि बेसची आवश्यकता असेल.
टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTeslaटेस्लाCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूकJioजिओ