शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:19 IST

1 / 7
सिमोन टाटा यांनी टाटा समूहासाठी एक मजबूत व्यावसायिक वारसा सोडला आहे. १९९० च्या दशकात लॅक्मे हिंदुस्तान युनिलिव्हरला विकण्यापूर्वी, त्यांनी अनेक दशके लॅक्मेचे यशस्वी मार्गदर्शन केले.
2 / 7
टाटा समूहाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'भारतातील अग्रगण्य कॉस्मेटिक ब्रँड म्हणून लॅक्मेच्या विकासामध्ये त्यांनी दिलेले योगदान आणि वेस्टसाइड चेनसह फॅशन रिटेलचा पाया रचल्याबद्दल त्यांना नेहमीच स्मरणात ठेवले जाईल. त्यांनी सर रतन टाटा इन्स्टिट्यूटसह अनेक परोपकारी संस्थांच्या कार्यालाही मार्गदर्शन केले.'
3 / 7
१९३० मध्ये स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे जन्मलेल्या सिमोन यांनी जिनेव्हा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. त्या १९५३ मध्ये पर्यटक म्हणून पहिल्यांदा भारतात आल्या होत्या. १९५५ मध्ये त्यांनी नवल एच. टाटा यांच्याशी विवाह केला आणि १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला टाटा समूहात आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली.
4 / 7
१९६२ मध्ये त्यांना टाटा समूहाच्या व्यावसायिक जगात प्रवेश मिळाला, जेव्हा त्यांची लॅक्मेच्या बोर्डावर नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी लॅक्मे ही टाटा ऑईल मिल्सची उपकंपनी होती. लॅक्मेला सौंदर्य प्रसाधन उद्योगातील अग्रगण्य ब्रँड बनवण्याचे श्रेय त्यांनाच जाते.
5 / 7
१९९६ मध्ये सिमोन टाटा यांनी लॅक्मे ब्रँड हिंदुस्तान लीवर लिमिटेडला विकला. या विक्रीतून मिळालेल्या निधीचा उपयोग ट्रेंट या कंपनीच्या स्थापनेसाठी करण्यात आला, ज्यातून टाटांचा प्रसिद्ध 'वेस्टसाइड' ब्रँड तयार झाला. वेस्टसाइडचे कामकाज ट्रेंट लिमिटेड अंतर्गत चालते. सिमोन टाटा यांनी २००६ पर्यंत ट्रेंटच्या गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
6 / 7
सिमोन टाटा यांनी सर रतन टाटा इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले. यासोबतच, त्या फ्रान्सच्या संस्थेशी संलग्न असलेल्या चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड इंडिया या धर्मादाय संस्थेच्या ट्रस्टी होत्या. त्या इंडिया फाउंडेशन फॉर द आर्ट्सच्याही ट्रस्टी होत्या.
7 / 7
टाटा कुटुंबात त्यांच्यामागे त्यांचे पुत्र नोएल टाटा, सून आलू मिस्त्री आणि नातवंडे नेविल, माया आणि लिआ असा परिवार आहे.
टॅग्स :TataटाटाRatan Tataरतन टाटाNoel Tataनोएल टाटाbusinessव्यवसाय