Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:14 IST
1 / 10प्लॅटिनम गुंतवणुकीच्या फायद्यांबद्दल घेण्यापूर्वी त्याच्या वापराबद्दल घ्या. जसा, सोन्या-चांदीचा तुडवडा निर्माण होतो, तेच प्लॅटिनमबद्दलही आहे. जागतिक प्लॅटिनम गुंतवणूक परिषदच्या रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षांपासून बाजारात प्लॅटिनमची पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त आहे आणि हा तुटवडा पुढील काही वर्षांपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या किंमती वाढू शकतात.2 / 10प्लॅटिनमचा वापरही औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होतो. वाहनांमधील उत्प्रेरक कन्व्हर्टरमध्ये प्लॅटिनमचा जास्त वापर होतो. सगळीकडे प्रदूषण नियंत्रणाबद्दल कडक कायदे केले जात असल्याने प्लॅटिनमची मागणी वाढण्याची शक्यता आहे.3 / 10पॅलेडियम महाग होत आहे. त्यामुळे आता ऑटोमोटिव्ह उत्पादक गॅसोलीन (पेट्रोलवरील) वाहनांमध्ये प्लॅटिनमचा वापर अधिक करत आहेत, ज्यामुळे त्याची मागणीही वाढत आहे. हायड्रोजन इंधन पेशी ज्याला इंग्रजीत Hydrogen Fuel Cells आणि हायड्रोजनचे उत्पादन यांसारख्या ग्रीन एनर्जी तंत्रज्ञानामध्ये प्लॅटिनम अत्यावश्यक धातू बनला आहे. भविष्यातील स्वच्छ ऊर्जा क्षेत्राच्या वाढीमुळे प्लॅटिनमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते.4 / 10आता मुद्दा प्लॅटिनमच्या किंमतीचा, इतिहासात डोकावल्यास प्लॅटिनमची किंमत अनेकदा सोन्यापेक्षा जास्त राहिली आहे. पण सध्या प्लॅटिनमची किंमत सोन्यापेक्षा कमी असल्याने, अनेक विश्लेषक प्लॅटिनम मूल्य धारण कमी असल्याचा अंदाज वर्तवतात, ज्यामुळे तो दीर्घकाळात चांगला परतावा देऊ शकतो.5 / 10सोने आणि चांदीप्रमाणे जागतिक अस्थिरतेच्या काळात महागाई आणि बाजारपेठेतील चढ-उतारांपासून संरक्षण म्हणून प्लॅटिनम उपयुक्त ठरू शकते. पण, त्यात काही धोकेही आहेत. यातील पहिला म्हणजे जगातील बहुतांश प्लॅटिनमचे उत्पादन दक्षिण आफ्रिका आणि रशिया यांसारख्या काही प्रमुख देशांमध्येच होते.6 / 10 कामगार संप, ऊर्जा संकट किंवा राजकीय अस्थिरता यामुळे प्लॅटिनमचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याच्या किंमती अचानक वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. रशियावरील जागतिक निर्बंधांमुळे पुरवठ्यात अडथळे येत आहेत.7 / 10प्लॅटिनमची मागणी सुमारे ६० टक्के औद्योगिक वापरासाठी, विशेषतः ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी असते. जागतिक आर्थिक मंदी किंवा ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील मागणी कमी झाल्यास प्लॅटिनमच्या किंमतीवर त्वरित आणि मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर प्लॅटिनमचा बाजार सोन्यापेक्षा लहान असल्याने व मोठ्या गुंतवणुकीमुळे किंमतीमध्ये जास्त चढ-उतार होण्याची शक्यता असते.8 / 10औद्योगिक वापरामुळे, प्लॅटिनमच्या किंमती फक्त गुंतवणूक मागणीवर अवलंबून नसतात, ज्यामुळे सोन्याच्या तुलनेत त्याचे मूल्य काही प्रमाणात स्थिर राहू शकते. भारतांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास भारतात प्लॅटिनमच्या दागिन्यांची मागणी वाढत आहे, विशेषतः उच्च वर्गीय बाजारपेठेत तो प्रतिष्ठेचा धातू मानला जातो. सोन्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहक प्लॅटिनमकडे वळू शकतात, ज्यामुळे भारतीय बाजारातील मागणी वाढेल.9 / 10भारतातील मेक इन इंडिया आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील वाढ, तसेच भारताच्या ग्रीन हायड्रोजन धोरणामुळे प्लॅटिनमची औद्योगिक मागणी भविष्यात लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या किंमती वाढून चांगला परतावा मिळू शकतो. भारतीय गुंतवणूकदारांसाठी प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करण्यासाठी सध्या प्लॅटिनम ईटीएफ (ETF), प्लॅटिनम नाणी किंवा बार (Coins and Bars) तसेच प्लॅटिनम दागिने हे पर्याय उपलब्ध आहेत.10 / 10प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, कारण त्यात जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.