शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 22:49 IST

1 / 8
भारतीय रेल्वेने उद्यापासून अर्थात १ जुलैपासून रेल्वे तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या नॉन-एसी क्लासच्या भाड्यात प्रति किलोमीटर एक पैसा, तर एसी क्लासच्या तिकीट दरात प्रति किलोमीटर दोन पैसे वाढ करण्यात आली आहे.
2 / 8
रेल मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी 24 जून रोजी प्रस्तावित भाड्यात सुधारणा करण्याचे संकेत दिले होते. मात्र, रेल्वे गाड्या आणि श्रेणींनुसार भाड्यात वाढ करण्यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली आहे.
3 / 8
दैनंदिन प्रवाशांच्या हितासाठी, उपनगरीय गाड्या आणि मासिक हंगामी तिकिटांच्या (एमएसटी) भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ५०० किमी पर्यंतच्या अंतरासाठी सामान्य द्वितीय श्रेणीच्या भाड्यात आणि त्याहून अधिक अंतरासाठी तिकिटांच्या दरात प्रति किलोमीटर अर्धा पैसे वाढ करण्यात आली आहे.
4 / 8
याशिवाय, १ जुलैपासून सामान्य स्लीपर क्लास आणि प्रथम श्रेणीतील प्रवाशांना प्रति किलोमीटर अर्धा पैसा अधिक द्यावा लागेल.
5 / 8
मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार, ही भाडे सुधारणा राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत, महामना, गतिमान, अंत्योदय, जन शताब्दी, युवा एक्सप्रेस, एसी विस्टाडोम कोच, अनुभूती कोच आणि सामान्य उपनगरीय सेवा, यासारख्या प्रीमियर आणि विशेष ट्रेन सेवांना देखील लागू असेल.
6 / 8
सुधारित भाडे ०१.०७.२०२५ रोजी किंवा त्यानंतर बुक केलेल्या तिकिटांना लागू असेल. या तारखेपूर्वी जारी केलेली तिकिटे कोणत्याही भाडे समायोजनाशिवाय विद्यमान भाड्यांवर वैध राहतील. पीआरएस, यूटीएस आणि मॅन्युअल तिकिटिंग सिस्टिम अपडेट केली जात आहे.
7 / 8
मंत्रालयाच्या मते, सहायक शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. उदाहरणार्थ, आरक्षण शुल्क, सुपरफास्ट अधिभार आणि इतर शुल्कात बदल करण्यात आलेला नाही.
8 / 8
५०१ ते १५०० किमी पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना द्वितीय श्रेणीच्या डब्यांसाठी ५ रुपये अधिक द्यावे लागतील, तर १५०१ ते २५०० किमी पर्यंतच्या प्रवासासाठी भाडे १० रुपयांनी वाढेल. याशिवाय, २५०१ ते ३००० किमी पर्यंतच्या प्रवासासाठी तिकिटाचे दर १५ रुपयांनी वाढतील.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासीrailwayरेल्वे