याला म्हणतात 'बाप' शेअर...! ₹१०००० लावणाऱ्यांनाही बनवलं कोट्यधीश; केवळ ४ वर्षांत दिला १२००००% चा बंपर परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 20:52 IST
1 / 8शेअर बाजारातील एका कंपनीच्या शेअरने एवढा छप्परफाड परतावा दिला आहे की, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ ४ वर्षातच तब्बल १,२०,०००% एवढा परतावा दिला आहे. अर्थात गेल्या ४ वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल, ते आता मालामाल झाले असतील. 2 / 8गेल्या ३ महिन्यांचा विचार करता, केवळ तीन महिन्यांतच या शेअरने २९१.३४% एवढा परतावा दिला आहे. जानेवारीपासून ते आतापर्यंत हा शेअर ३५० टक्क्यांनी वाधारला आहे. 3 / 8एक वर्षापूर्वी हा शेअर २२१ रुपयांवर होता. तो आता १९११ रुपयावर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने ६६८.४८% चा परतावा दिला आहे. या कंपनीचे नाव आहे वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लि. (Waaree Renewable Technologies Ltd). 4 / 8वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीजचा शेअर शुक्रवारी १.३७% ने घसरला. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३,०३७.७५ रुपये तर नीचांक २१५.२० रुपये एवढा आहे.5 / 8चार वर्षांपूर्वी केवळ १.६४ रुपयांवर होता शेअर - चार वर्षांपूर्वी १० जुलै २०२० रोजी हा शेअर केवळ १.६४ रुपयांवर व्यवहार करत होते. या पातळीवरू हा शेअर आता १९११ रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने १,२०,००० टक्के एवढा छप्परफाड परतावा दिला आहे.6 / 8जर एखाद्या व्यक्तीने गेल्या ४ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये केवळ १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता त्याचे १ कोटी रुपयांहूनही अधिक झाले असते. 7 / 8काय करते कंपनी? - वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी लिमिटेडचे सौर उत्पादन केंद्र महाराष्ट्रात आहे. ही कंपनी अक्षय ऊर्जा संसाधनांच्या माध्यमाने वीज निर्मिती करते. तसेच, सल्लागार सेवाही प्रदान करते.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)