शेअरचा धमाका...! एकाच वर्षात दिला 60000% परतावा, ₹3 वरून ₹1700 वर पोहोचला; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:54 IST
1 / 7शेअर बाजारातील श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्कच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी आली आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ एकाच वर्षात बंपर परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर केवळच एकाच वर्षात 60,000% पेक्षाही अधिक वधारला आहे. 2 / 7या कालावधीत श्री अधिकारी ब्रदर्सचा शेअर 3 रुपयांवरून 1700 रुपयांपर्यंत वाढला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 2197.70 रुपये तर नीचांकी पातळी 2.73 रुपये आहे.3 / 7एका वर्षात 60000% हून अधिक परतावा - गेल्या एका वर्षात श्री अधिकारी ब्रदर्सचा शेअर 60777% ने वधारला आहे. हा शेअर 27 डिसेंबर 2023 रोजी 2.95 रुपयांवर होता. तो 24 डिसेंबर 2024 रोजी 1795.90 रुपयांवर बंद झाला.4 / 7गेल्या 2 वर्षांचा विचार करता, या कालावधीत कंपनीचा शेअर 73500% वधारला. दरम्यान हा शेअर 2.44 रुपयांवरून वाढून 1795 रुपयांच्या वर बंद झाला. 5 / 7श्री अधिकारी ब्रदर्सच्या मार्केट कॅपनेही 4500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 5 वर्षात कंपनीचा शेअर 127268 टक्क्यांनी वधारला आहे.6 / 7या वर्षात आतापर्यंत 52000% हून अधिक तेजी - या वर्षात आतापर्यंत श्री अधिकारी ब्रदर्सचा शेअर 52876% ने वधारला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच, 1 जानेवारी 2024 रोजी कंपनीचा शेअर 3.39 रुपयांवर होता. तो 24 डिसेंबर 2024 रोजी 1795.90 रुपयांवर बंद झाला. 7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)