याला म्हणतात पैशांचा धो-धो पाऊस...! ₹2 च्या शेअरची कमाल, देतोय 'तुफान' परतावा; एनर्जी सेक्टरमध्ये काम करते कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 13:57 IST
1 / 9शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. असा एक शेअर म्हणजे, पॉवर जनरेशनशी संबंधित कंपनी सुराना टेलीकॉम अँड पॉवरचा. 2 / 9पेनी कॅटेगरीच्या या स्टॉकने गेल्या चार वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना थक्क करणारा परतावा दिला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 796 टक्क्यांनी वधारली आहे. जून 2020 मध्ये या शेअरची किंतम केवळ ₹2.95 होती. ती वाढून आता ₹26.45 वर पोहोचली आहे.3 / 9केव्हा किती परतावा? - गेल्या 5 वर्षांचा विचार करता, हा शेअर 494 टक्यांनी वधारला आहे. हा शेअर जून 2019 मध्ये ₹4.05 वर होता. तो आता 26 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे गेल्या केवळ 3 वर्षांत, या शेअरने 259 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तसेच जून 2021 मध्ये हा शेअर ₹6.70 वर होता, तो आता 26 रुपयांवर पोहोचला आहे.4 / 9या वर्षात किती दिला परतावा - गेल्या काही दिवसांतही सुराना टेलीकॉम अंड पॉवरने आपल्या गुंतणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या वर्षातं 172 टक्के तर 2024 मध्ये वार्षिक आधारावर 56 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 5 / 9या शेअरने या वर्षांत गेल्या 6 महिन्यांपैकी 4 महिन्यांत पॉझिटिव्ह परतावा दिला आहे. या शेअरमध्ये गेल्या मे महिन्यात 18 टक्के आणि एप्रिल महिन्यात 2 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर, जून महिन्यात जवळपास 35 टक्क्यांनी वधारला. 6 / 9तत्पूर्वी मार्च महिन्यात या शेअरमध्ये 18 टक्के आणि फेब्रुवारी महिन्यात 5.5 टक्क्यांची घसरण दिसून आली होती. जानेवारी 2024 मध्ये हा शेअर 23 टक्क्यांनी वधारला होता. 7 / 9सुराना टेलीकॉम अँड पॉवरने ₹26.57 चा उच्चांक गाठला आहे. 14 जुलै, 2023 रोजी नोंदवल्या गेलेल्या 52-आठवड्यांच्या ₹8.68 या निचांकापासून या शेअरने 206 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. 8 / 9सुराना टेलीकॉम अँड पॉवर लिमिटेड ही भारतात सौर आणि पवन ऊर्जेचे उत्पादन, विक्री आणि सौर मॉड्यूलचा व्यापार करते.9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)