मल्टीबॅगर शेअरचं 'तुफान'! 3 वर्षात ₹103 वरून थेट ₹10000 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 23:56 IST
1 / 8शेअर बाजारात एसजी मार्टच्या शेअरने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. एसजी मार्टचा शेअर्स गेल्या केवळ 3 वर्षांतच 103 रुपयांवरून थेट 10000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मल्टीबॅगर कंपनीने या कालावधीत गुंतवणूकदारांना 10000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. 2 / 8आता कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरचे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. एसजी मार्टने 1:1 प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. अर्थात, कंपनी प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर देणार आहे. याशिवाय, कंपनी अपले शेअर देखील वाटत आहे. एसजी मार्टने बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट 22 फेब्रुवारी 2024 निश्चित केली आहे.3 / 83 वर्षात 10000% हून अधिकची उसळी - एसजी मार्टच्या शेअरच्या किंमतीत गेल्या 3 वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. 12 फेब्रुवारी 2021 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 103.85 रुपये होती. तो 13 फेब्रुवारी 2024 रोजी रु. 10609.15 वर बंद झाला आहे. गेल्या 3 वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 10115% ची वाढ झाली आहे.4 / 8ही स्मॉलकॅप कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच बोनस शेअरचे गिफ्ट देत आहे. कंपनीच्या शेअचा 52 आठवड्यांचा उच्चांक 12770 रुपये एवढा आहे. तसेच, नीचांक 342.95 रुपये एवढा आहे.5 / 86 वर्षात 15000% हून अधिक तेजी - एसजी मार्टच्या शेअरमध्ये गेल्या 6 वर्षात 15987% ची तेजी आली आहे. 21 फेब्रुवारी 2018 रोजी कंपनीचा शेअर 65.95 रुपयांवर होते. तो 13 फेब्रुवारी 2024 रोजी 10609.15 रुपयांवर पोहोचला आहे. 6 / 8गेल्या 5 वर्षा एसजी मार्टच्या शेअरमध्ये 9918 पर्सेंटची उसळी घेतली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 105.90 रुपयांवरून 10609.15 रुपयांवर पोहोचला आहे. 7 / 8तसेच, गेल्या एक वर्षाचा विचार करता, कंपनीच्या शेअरमध्ये 2475 पर्सेंटची तेजी आली आहे. तर 6 महिन्यांचा विचार करता, कंपनीचा शेअर 241 पर्सेंटने वधारला आहे.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)