"छोटा पॅकेट बडा धमाका...!" या शेअरनं ५ वर्षांत १ लाखाचे केले १.४ कोटी, दिला १४८२५% परतावा; गुंतवणूकदार मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 23:07 IST
1 / 7शेअर बाजार असे अनेक शेअर असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात मालामाल बनवतात. मात्र, काही शेअर असेही असतात, जे अगदी अल्पशा काळातच गुंतवणूकदारांना मालामाल करून जातात. 2 / 7असाच एक शेअर म्हणजे,इंडो थाई सिक्युरिटीजचा (Indo Thai Securities Ltd). इंडो थाई सिक्युरिटीजच्या शेअरने केवळ ५ वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १४८२५% चा जबरदस्त परतावा दिला आहे. 3 / 7अर्थात, जर कुणी ५ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज ती रक्कम १.४९ कोटी रुपयांवर पोहोचली असती. 4 / 7इंडो थाई सिक्युरिटीजचा शेअर गेल्या शुक्रवारी (२१ फेब्रुवारी २०२५) १,९८० रुपयांवर बंद झाला. मात्र, ५ वर्षांपूर्वी हा शेअर केवळ १३.४० रुपयांवर व्यवहार करत होता.5 / 7सध्या इंडो थाई सिक्युरिटीजचे मार्केट कॅप २,१९० कोटी रुपये आहे. या स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २२००.२० रुपये तर नीचांक २४१.५० रुपये एवढा आहे. 6 / 7गेल्या तीन महिन्यांत कंपनीने ८८.५७% परतावा दिला आहे. तर, गेल्या १ वर्षात कंपनीने ५००% एवढा बंपर परतावा दिला आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)