शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित गुंतवणूक...! बँकांनाही मागे टाकणारी पोस्ट ऑफिसची 'खास' योजना; २ लाख गुंतवा अन् ८९९९० रुपयांचं फिक्स व्याज मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 14:54 IST

1 / 7
सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा हवा असणाऱ्या ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिस (डाकघर) सध्या बँकांच्या तुलनेत अधिक आकर्षक व्याजदर ऑफर करत आहे. पोस्ट ऑफिसच्या 'टीडी' (Time Deposit) स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास दिग्गज बँकांच्या मुदत ठेवींपेक्षाही (FD) अधिक परतावा मिळत आहे.
2 / 7
विशेष म्हणजे या योजनांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण असल्याने गुंतवणुकीला पूर्ण सुरक्षा आणि सरकारी हमी मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी टीडी खाते उघडता येते.
3 / 7
बँकांच्या एफडीप्रमाणेच यात ठराविक मुदतीनंतर निश्चित व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळते. सध्याच्या दरानुसार, १ वर्षाच्या टीडीवर ६.९%, २ वर्षांवर ७.०%, ३ वर्षांवर ७.१% तर ५ वर्षांच्या टीडीवर ७.५% इतका भरघोस व्याजदर दिला जात आहे.
4 / 7
२ लाख रुपयांवर ८९९९० रुपयांचा परतावा - जर एखाद्या ग्राहकाने ५ वर्षांच्या टीडी योजनेत २००००० रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीच्या वेळी त्याला एकूण २८९९९० रुपये मिळतील. यात निव्वळ व्याज ८९९९० रुपये एवढे असेल.
5 / 7
सध्या देशातील साधारणपणे कोणतीही मोठी बँक ५ वर्षांच्या एफडीवर ७.५% व्याज देत नाही, यामुळे पोस्टाची ही योजना गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
6 / 7
बँक आणि पोस्टातील फरक - महत्त्वाचे म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या टीडी स्कीममध्ये सर्व वयोगटातील ग्राहकांना समान व्याज मिळते. याउलट, बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत ०.५०% अधिक व्याज दिले जाते. काही बँका ८० वर्षांवरील ग्राहकांसाठी विशेष सवलत देतात.
7 / 7
बँक आणि पोस्टातील फरक - महत्त्वाचे म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या टीडी स्कीममध्ये सर्व वयोगटातील ग्राहकांना समान व्याज मिळते. याउलट, बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत ०.५०% अधिक व्याज दिले जाते. काही बँका ८० वर्षांवरील ग्राहकांसाठी विशेष सवलत देतात.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसMONEYपैसाInvestmentगुंतवणूकbankबँक