शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जिओचा धमाका, ६६६ रुपयांच्या रिचार्जमध्ये होणार १५० रूपयांची बचत; पाहा जबरदस्त ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 1:40 PM

1 / 6
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) नेहमीच चर्चेत असते. 5G स्पेक्ट्रम लिलावातदेखील (5G Spectrum Auction) रिलायन्स जिओने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. रिलायन्स जिओनं स्पेक्ट्रम लिलावात सर्वाधिक बोली लावली. Jio ची 5G सेवा 15 ऑगस्टपासून सुरू होऊ शकते, असे संकेतही रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी (Akash Ambani) यांनी दिले.
2 / 6
दरम्यान, अन्य दूरसंचार कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओचे प्लॅन अद्यापही स्वस्त आहेत. तसंच कंपनीच्या प्लॅन्समध्ये कमी खर्चात अधिक फायदेही मिळतात. जिओ रिचार्जवर सध्या मोठी सूट दिली जात आहे. यामध्ये तुमची मोठी बचतही होऊ शकते. ही सूट मिळविण्यासाठी तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. जाणून घेऊया काय आहे ही ऑफर.
3 / 6
Jio कडे 84 दिवसांची वैधता असलेला लोकप्रिय प्लॅन आहे. कंपनीने याचे नाव Jio 666 Prepaid Plan असं ठेवलं आहे. जर तुम्ही या प्लॅननेच रिचार्ज करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या प्लॅनच्या रिचार्जवर सध्या मोठी सूट मिळत. त्यामुळे तुमची मोठी बचत होणार असून तुम्हाला कमी किंमतीत या प्लॅनचे सर्व बेनिफिट्स मिळणार आहेत.
4 / 6
पेटीएमवर बंपर ऑफर सुरू आहे. तुम्ही या ऑफर अंतर्गत रिचार्ज खरेदी केल्यास तुम्हाला खूप मोठी सूट देखील मिळू शकते. परंतु यासाठी कंपनीनं एक अट घातली आहे. ही सूट मिळवण्यासाठी तुम्हाला प्रोमो कोडची आवश्यकता असेल. ज्यांच्या नंबरवर ही ऑफर लागू होणार आहे अशाच लोकांना तो प्रोमो कोड दिसेल. ज्या लोकांना ही ऑफर लागू होणार नाही त्यांना हा प्रोमो कोडही दिसणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोमो कोड लिस्टमध्ये कोड आहे का नाही हे पाहावं लागेल.
5 / 6
ग्राहकांना Jio 666 प्रीपेड प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. यासोबतच यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सुविधाही मिळते. तसेच, या प्लॅनची ​​खासियत म्हणजे यामध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMS देखील मिळतात. याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.
6 / 6
लवकरच आता रिलायन्स जिओ देशात 5जी सेवांची सुरूवात करणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्पेक्ट्रम लिलावात अपेक्षेप्रमाणेच रिलायन्स जिओ या कंपनीनं सर्वाधिक म्हणजे 88,078 कोटी रूपयांची बोली लावली. दरम्यान, रिलायन्स जिओ देशात सर्वात स्वस्त 5G सेवा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. खुद्द रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी दिली. मोठ्या प्रमाणात केलेल्या स्पेक्ट्रम खरेदीनंतर रिलायन्स जिओला 22 सर्कल्समध्ये उत्तम सुविधा पुरवण्यास मदत मिळणार आहे. 
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेलMukesh Ambaniमुकेश अंबानी