महिन्याला केवळ ६० रूपये खर्च; Reliance Jio च्या 'या' विशेष प्लॅनमध्ये मिळतोय अनलिमिटेडेट डेटा आणि कॉलिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 10:31 IST
1 / 10रिलायन्स जिओनं बाजारात एन्ट्री घेतल्यापासून सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. रिलायन्स जिओच्या एन्ट्रीनंतर सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी मोफत डेटा आणि मोफत कॉलिंग देण्याची सेवा सुरू केली होती.2 / 10रिलायन्स जिओ सातत्यानं काही नवनव्या ऑफर्स घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा रिलायन्स जिओनं न्यू जिओफोन २०२१ ही ऑफर आणली आहे. 3 / 10या ऑफर अंतर्गत नव्या युझर्ससाठी १९९९ रूपये आणि १४९९ रूपयांचे प्लॅन आणले आहेत. ७४९ रूपयांचा येणारा प्लॅनदेखील खास आहे. 4 / 10यामध्ये रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला पुढील वर्षभर रिचार्ज करावं लागणार नाही. जिओफोनच्या या प्लॅनचा महिन्याचा खर्च केवळ ६० रूपये आहे. जाणून घेऊया या प्लॅनसोबत काय बेनिफिट्स मिळतात. 5 / 10जिओ फोनच्या ७४९ रूपयांच्या ऑफरमध्ये १२ महिन्यांसाठी अनलिमिटेड सेवा मिळणार आहे. यामध्ये युझर्सना ३६५ दिवसांसाठी फ्री व्हॉईस कॉलिंगचाही फायदा मिळेत.6 / 10तसंच या प्लॅनसोबत दर महिन्याला २ जीबी हायस्पीड आणि त्यानंतर अनलिमिटेड असा डेटा देण्यात येईल. १ मार्चपासून जिओची ही ऑफर सुरू होणार आहे. 7 / 10परंतु जिओनं या प्लॅनसोबत एसएमएस सेवा मिळेल का नाही याबाबत मात्र कोणतीही माहिती दिली नाही.8 / 10जिओ फोन्ससाठी रिलायन्स जिओचा १४९९ रूपयांचा एक प्लॅनदेखील आहे. या प्लॅनचा महिन्याचा खर्च केवळ १२५ रूपये इतका आहे.9 / 10या ऑफर अंतर्गत ग्राहकांना जिओ फोन डिव्हाईसदेखील मिळेल. यासोबतच वर्षभरासाठी मोफत कॉलिंगही मिळेल. 10 / 10याशिवाय दर महिन्याला २ जीबी डेटा आणि त्यानंतर अनलिमिटेड डेटादेखील देण्यात येणार आहे.