एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:20 IST
1 / 10राजेश मेहता हे 'राजेश एक्सपोर्ट लिमिटेड' या कंपनीचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी सोन्याचे दागिने निर्यात करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. स्थानिक स्तरावर सोन्याची उत्पादने बनवून त्यांची जागतिक स्तरावर विक्री केली जाते.2 / 10राजेश एक्सपोर्ट लिमिटेड केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठी सोन्याची कंपनी म्हणून गणली जाते. या कंपनीच्या व्यवसायात सोन्याची रिफायनिंग (शुद्धीकरण) करण्यापासून ते दागिन्यांच्या विक्रीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.3 / 10राजेश मेहता यांचा सोन्याचा हा व्यवसाय भारतात कार्यरत असूनही जगभरातील तब्बल ६० हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे, ज्यामुळे कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान टिकवून आहे.4 / 10राजेश मेहता हे जगातील सर्वात मोठ्या गोल्ड रिफायनिंग कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीने स्वित्झर्लंडमधील 'वॅलकैम्बी' या सुप्रसिद्ध गोल्ड रिफायनरी कंपनीचे अधिग्रहण केले आहे.5 / 10राजेश एक्सपोर्ट्सने २०१५ मध्ये विकत घेतलेली स्विस रिफायनरी 'वॅलकैम्बी' ही प्रचंड क्षमतेची आहे. ही रिफायनरी दरवर्षी २,००० टनांहून अधिक सोने, चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियम यांसारख्या धातूंचे शुद्धीकरण करू शकते.6 / 10राजेश मेहता यांची कंपनी राजेश एक्सपोर्ट्स जगातील एकूण सोन्यापैकी ३५% पेक्षा जास्त सोन्यावर प्रक्रिया करते. यामुळे ही कंपनी 'फॉर्च्यून ५००' कंपन्यांमध्ये समाविष्ट असून ती जागतिक स्तरावर सर्वात मोठ्या ज्वेलरी कंपन्यांपैकी एक आहे.7 / 10राजेश मेहता यांना सोन्या-चांदीचा व्यापार वारसा हक्काने मिळाला होता. त्यांनी सुरुवातीला १९८२ मध्ये चेन्नईतून चांदीचे दागिने खरेदी करून राजकोटमध्ये विकण्यास सुरुवात केली. या लहान व्यवसायालाच त्यांनी आपल्या मेहनतीने एका विशाल जागतिक उद्योगात रूपांतरित केले.8 / 10सोन्याच्या व्यवसायात सतत मिळत असलेल्या यशामुळे आणि कंपनीच्या प्रचंड विस्तारामुळे राजेश मेहता यांची गणना बंगळुरूमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. त्यांचे कठोर परिश्रम आणि व्यावसायिक दूरदृष्टी यासाठी ओळखली जाते.9 / 10राजेश मेहता यांचे वडील जसवंतरी मेहता यांनी ज्वेलरी व्यवसायासाठी गुजरातहून कर्नाटक गाठले होते. वडिलांकडून प्रेरणा घेऊन, राजेश मेहता यांनी सुरुवातीला बंगळुरूमध्ये आपल्या गॅरेजमध्ये सोन्याचे दागिने बनवण्यासाठी एका लहान युनिटची सुरुवात केली होती.10 / 10छोट्या युनिटपासून सुरुवात करून मिळालेल्या यशामुळे त्यांनी लवकरच अनेक देशांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची निर्यात सुरू केली. याच निर्यातीच्या माध्यमातून त्यांनी 'भारतातील सर्वात मोठा गोल्ड ज्वेलरी एक्सपोर्टर' ही ओळख मिळवली आहे.