Railwayच्या 10 शेअर्सची कमाल, लोकांना केलं मालामाल; 6 महिन्यात दिला 100 टक्क्यांहून अधिक परतावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 15:50 IST
1 / 12रेल्वेच्या काही शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. आज आम्ही आपल्याला अशाच काही शेअर्ससंदर्भात माहिती देणार आहोत. रेल्वेच्या 10 शेअर्सनी गेल्या केवळ 6 महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. यात टिटागड रेल्वे सिस्टिम्स आणि IRFC सह अनेक रेल्वे स्टॉकचा समावेश आहे. 2 / 12Rail Vikas Nigam Ltd - रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर आज 2.98 टक्क्यांच्या वाढीसह 159.00 वर पोहोचला आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 143.12 टक्क्यांचा परतावा दिला आहे.3 / 12Titagarh Rail Systems टीटागड रेल सिस्टिमच्या शेअरमध्ये आज 1.25 टक्के अर्थात 10.45 रुपयांची वाढ दिसून येत आहे. या कंपनीचा स्टॉक 844.25 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीचा शेअर 80.63 टक्क्यांपर्यंत वधारला आहे.4 / 12Rail India Technical and Economic Service रेल्वे इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसचा शेअर आज 1.23 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. या शेअरची किंमत 520.10 च्या पातळीवर आहे. हा स्टॉक 6 महिन्यांच्या कालावधीत 47.82 टक्क्यांनी वधारला आहे.5 / 12RailTel RailwayTel चा शेअर आज 0.82 टक्क्यांच्या वाढीसह 233.55 च्या पातळीवर दिसत आहेत. 6 महिन्यांत या कंपनीचा स्टॉक 106.96 टक्क्यांनी वाढला आहे.6 / 12Indian Railway Ctrng nd Trsm Corp Ltd IRCTC च्या शेअर्समध्ये आज काही प्रमाणात घसरण बघायला मिळत आहे. हा शेअर 0.33 टक्क्यांनी घसरून 700.90 रुपयांवर आला आहे. तसेच गेल्या 6 महिन्यांत, हा शेअर 13.82 टक्के म्हणजेच 85.10 रुपयांनी वधारला आहे.7 / 12Container Corporation of India कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Concor) चा शेअर गेल्या 6 महिन्यांत 12.19 टक्के अर्थात 73.40 रुपयांनी वधारला. आज या शेअरमध्ये 0.92 टक्क्यांची घसरण बघायला मिळाली आहे.8 / 12Oriental Rail Infrastructure Limited - ओरिएंट रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शअरमध्येही आज तेजी दिसत आहे. हा शेअर आज अपर सर्किटवर पोहोचला असून 5 टक्क्यांच्या वाढीसह 85.57 रुपयांवर गेला आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत हा शेअर 59.35 टक्क्यांनी वधारला आहे.9 / 12BCPL रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर लि. बीसीपीएल रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर आज 3.76 टक्क्यांच्या वाढीसह 67.00 रुपयांवर आहे. गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत हा शेअर 52.27 टक्क्यांनी वधारला आहे.10 / 12Indian Railway Finance Corp Ltd - इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये आजही अप्पर सर्किट लागले आहे. कंपनीचा शेअर आज 7.27 टक्क्यांच्या वाढीसह 71.55 च्या पातळीवर आहे. तर गेल्या 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर 153.72 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.11 / 12Kernex Microsystems share - केर्नेक्स मायक्रोसिस्टम्सच्या शेअर्समध्येही आज अपर सर्किट लागले आहे. रेल्वेचा हा शेअर 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 475.35 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 65.71 टक्क्यांनी वधारला आहे.12 / 12(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)