शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्राध्यापकाचं काम सोडलं, बनले Gautam Adani यांचा 'राईट हँड'; कोट्यवधींचं साम्राज्य चालवण्यात भूमिका काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 9:21 AM

1 / 7
Gautam Adani : गौतम अदानी (Gautam Adani) हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सनुसार त्यांची एकूण संपत्ती ६,७७,५२० कोटी रुपये आहे. ते अदानी समूहाचे प्रमुख आहेत. अदानी समूहात वेगवेगळ्या कंपन्या आहेत. समूह विविध क्षेत्रात सक्रिय आहेत.
2 / 7
अदानी समूहाच्या १० कंपन्यांचं एकत्रित बाजार भांडवल सुमारे १६,००,००० कोटी रुपये आहे. एवढं मोठं व्यावसायिक साम्राज्य सांभाळण्यासाठी गौतम अदानी यांना त्यांच्या कुटुंबाची आणि जवळच्या लोकांची मदत मिळते. गौतम अदानी यांच्या कोट्यवधींच्या साम्राज्याची देखरेख करण्यासाठी मदत करणारी एक व्यक्ती म्हणजे मलय महादेविया.
3 / 7
अदानी समूहाच्या १० कंपन्यांचं एकत्रित बाजार भांडवल सुमारे १६,००,००० कोटी रुपये आहे. एवढं मोठं व्यावसायिक साम्राज्य सांभाळण्यासाठी गौतम अदानी यांना त्यांच्या कुटुंबाची आणि जवळच्या लोकांची मदत मिळते. गौतम अदानी यांच्या कोट्यवधींच्या साम्राज्याची देखरेख करण्यासाठी मदत करणारी एक व्यक्ती म्हणजे मलय महादेविया.
4 / 7
अदानी समूहात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ते गौतम अदानी यांचा राईट हँड मानले जातात. मलय महादेविया हे गौतम अदानी यांचे बालपणीचे मित्र आहेत. अदानी ग्रुपमध्ये येण्यापूर्वी ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
5 / 7
मलय महादेविया हे अदानी पोर्ट्स आणि सेझचे (APSEZ) पूर्णवेळ संचालक आहेत. याशिवाय, ते अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे (AAHL) CEO देखील आहेत. याशिवाय त्यांच्याकडे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्यात.
6 / 7
बंदरे आणि लॉजिस्टिक, रेल्वे, हेल्थकेअर, मेडिकल एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट एज्युकेशन आणि समूहाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इनिशिएटिव्हसह विविध क्षेत्रांमध्ये ते सेवा देतात. ते अदानी समूहाच्या सीएसआर विंग अदानी फाउंडेशनचे ट्रस्टीदेखील आहेत.
7 / 7
अदानी समूहासोबत प्रवास सुरू करण्यापूर्वी, मलय महादेविया हे अहमदाबादच्या शासकीय दंत महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक होते. त्यांनी मुंबई विद्यापीठातून डेंटल सर्जरीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण, तसंच गुजरात विद्यापीठातून कोस्टल इकोलॉजीमध्ये पीएचडी केलं आहे.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीbusinessव्यवसाय