अमेरिकेची नोकरी सोडली, भारतात परतले; गावखेड्यात उभारली कंपनी, ८ हजार कोटी कमावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 09:27 IST
1 / 10बहुतेक लोकांना भरपूर पैसा कमावण्यासाठी परदेशात जायला आवडते. पण जर तुम्ही सक्षम असाल तर तुम्हाला कुठेही यश नक्कीच मिळते. जगातील बहुतेक लोक मोठ्या शहरात राहण्याचे आणि परदेशात उच्च पगाराची नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात. एखाद्याला मोठ्या पॅकेजची नोकरी मिळाली तर तो स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.2 / 10पण असे फार कमी लोक आहेत जे स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त पगाराची नोकरी सोडण्यास मागेपुढे पाहत नाहीत. श्रीधर वेंबू (Sridhar Vembu) यांनीही असेच काहीसे केले आहे. श्रीधर वेंबू अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून भारतात परतले आणि त्यांनी येथील एका छोट्या गावात आपली कंपनी सुरू केली. आज त्या कंपनीची किंमत ८ हजार कोटींहून अधिक आहे. श्रीधर वेंबू यांनी इतके यश कसे मिळवले ते आपण जाणून घेऊ.3 / 10श्रीधर वेंबू तामिळनाडूतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. प्राथमिक शिक्षण तमिळ भाषेत पूर्ण केले. १९८९ मध्ये IIT मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केली. त्यानंतर पीएचडी करण्यासाठी ते अमेरिकेत गेले. येथे त्यांनी सॅन दिएगोस्थित क्वालकॉममध्ये नोकरी सुरू केली. सुमारे २ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नोकरीचा निरोप घेतला आणि ते भारतात परतले.4 / 10श्रीधर अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून भारतात आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले, नातेवाईकांनी श्रीधरला खूप समजावले, पण श्रीधर यांनी कोणाचेच ऐकले नाही. भारतात राहूनच व्यवसाय करायचा हे श्रीधर वेंबू यांनी ठरवलं होतं. १९९६ मध्ये वेंबू यांनी त्याच्या भावासोबत AdventNet नावाची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म सुरू केली. २००९ मध्ये या कंपनीचे नाव बदलून झोहो कॉर्पोरेशन करण्यात आले. त्यांनी आपल्या कंपनीच्या कार्यालयासाठी कोणत्याही मेट्रो शहराऐवजी तामिळनाडूतील तेनकासी जिल्हा निवडला होता. येथे त्यांनी आपल्या कंपनीचे कार्यालय बांधले.5 / 10 जोहोच्या कार्यालयाच्या बांधकामामुळे तेनकासीला जिल्ह्याचा दर्जा मिळाला. श्रीधर यांनी जवळच्या मथलमपराई गावात एक जुना कारखाना खरेदी करून त्याचे कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर केले. आज कंपनीचे सुमारे ५०० कर्मचारी तेनकासीमध्ये काम करतात. झोहोचा महसूल २०२२ मध्ये १ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ८,३०० कोटी रुपयांच्या वर गेला होता.6 / 10पद्मश्री पुरस्कारासाठी श्रीधर वेंबू यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म झोहोच्या सीईओला असलेल्या वेंबू यांना ते आवडले नाही. ते म्हणाले की, आयुष्यात मला अनेक बक्षिसे मिळाली आहेत. पद्मश्री सारखा पुरस्कार निस्वार्थीपणे काम करणाऱ्या, समाजसेवक इत्यादींना द्यायला हवा.7 / 10कोरोना महामारीमुळे गावातील मुले शाळेत जाऊ शकली नाहीत, तेव्हा श्रीधर यांनी स्वत: त्यांना शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला तामिळनाडूतील तेनकासी येथील आठ-दहा मुले त्यांच्याकडे शिकत असत.8 / 10१९९६ मध्ये सुरू झालेल्या ZOHO मध्ये २००० पर्यंत भारतात ११५ आणि अमेरिकेत ७ इंजिनिअर काम करत होते. तेव्हाच झोहोचा व्यवसाय १० मिलियन डॉलरपर्यंत पोहोचला होता.9 / 10श्रीधरच्या कंपनी झोहोचे ६ कोटींहून अधिक युजर्स आहेत आणि त्यांच्या ग्राहकांच्या यादीत लेव्हीज, अॅमेझॉन, फिलिप्स, ओला, शाओमी आणि झोमॅटो सारखी अनेक नावे आहेत.10 / 10जोहो यांनी कार्यालय बांधल्यामुळे तेनकाशीला जिल्ह्याचा दर्जा मिळाला आहे. परिसरात शेतीच्या विकासाला चालना मिळाली. स्थानिक शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. पंचायतीमध्ये गांडूळ खत निर्मितीही सुरू झाली आहे.